Troll : दिलीप कुमार यांची नात ‘सायशा’ला नवऱ्यासोबतचा फोटो शेयर करणं पडलं महागात, आता होतीये ट्रोल!
सोशल मिडियावर ट्रोलर्स तुमचे कौतुकही करतात. तर, एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला ट्रोलही करायला मागे पुढे बघत नाहीत.

मुंबई : सोशल मिडियावर ट्रोलर्स तुमचे बऱ्याचवेळा कौतुकही करतात. तर, एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला ट्रोलही करायला मागे पुढे बघत नाहीत. त्यामध्येही सेलिब्रिटीना ट्रोलर्सचा जास्त सामना करावा लागतो. सेलिब्रिटी सोशल मीडियावर जास्त सक्रिय असतात आणि ते चाहत्यांना त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी, फोटो आणि व्हिडिओ नेहमीच शेअर करत असतात. परंतु कधीकधी त्यांनी शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येते. असेच काहीसे दिलीप कुमारची (Dilip Kumar) नात सायेशाच्या (Sayyeshaa) बाबतीत घडली आहे. (Dilip Kumar’s granddaughter Sayyeshaa trolls on social media)
सायेशाने गेल्या वर्षी दक्षिण अभिनेता आर्याशी लग्न केले आहे. आर्या सायशापेक्षा 17 वर्षांनी मोठा आहे. नुकताच सायेशाने तिचा नवरा आर्याबरोबर एक फोटो शेअर केला आहे. मात्र, तिने शेअर केलेल्या या फोटोला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. आर्यासोबत डान्स करतानाचा एक फोटो तिने शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघांनीही एकमेकांचा हात धरला आहे. फोटो शेअर करताना सायेशाने लिहिले आहे की, मी माझ्या प्रेमासोबत डान्स करताना.
View this post on Instagram
सायेशा आणि आर्याचा हा फोटो मात्र, लोकांना मुळीच आवडलेला दिसत नाही. सायेशा आणि आर्याचा या फोटोला ट्रोलर्सने ट्रोल केले आहे. एका ट्रोलर्सने लिहिले की, वडील आणि मुलगी, तर दुसऱ्याने लिहिले की, वडिलांसोबत डान्स करताना. अनेक ट्रोलर्सने सायशाच्या या पोस्टवर अश्लील पोस्ट केल्या आहेत. सायेशा ही सायरा बानोची भाची शाहीनची मुलगी आहे.
संबंधित बातम्या :
Wrap Up : ‘चंदीगड करे आशिकी’चं चित्रीकरण संपलं, वाणी आणि आयुष्मान खुरानानं केले फोटो शेअर
Alia Bhatt | रणबीरबरोबर लग्न कधी करणार? वाचा आलिया भट्टचं उत्तर!
(Dilip Kumar’s granddaughter Sayyeshaa trolls on social media)
