AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दिल मिल गए’ फेम अभिनेत्याचा लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोट; 9 वर्षांपूर्वीच पत्नीने सोडलं घर

'दिल मिल गए' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता पंकित ठक्कर याने लग्नाच्या 24 वर्षांनंतर पत्नी प्राचीला घटस्फोट दिला आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हे दोघं वेगळे राहत होते. अखेर त्यांनी कायदेशीररित्या एकमेकांना घटस्फोट दिला आहे.

'दिल मिल गए' फेम अभिनेत्याचा लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोट; 9 वर्षांपूर्वीच पत्नीने सोडलं घर
पंकित ठक्कर आणि प्राचीImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 19, 2024 | 9:51 AM
Share

‘दिल मिल गए’, ‘बहु हमारी रजनीकांत’, ‘बरसातें’, ‘कुमकुम’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता पंकित ठक्करने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. 24 वर्षांच्या संसारानंतर अखेर पंकित आणि प्राचीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 2015 पासूनच त्यांच्यात संसारात काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. तेव्हापासूनच हे दोघं वेगवेगळे राहत होते. 2016 मध्ये त्यांनी वेगळं राहत असल्याचं माध्यमांसमोर जाहीर केलं होतं. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात त्यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतल्याचं कळतंय. यावर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलंय.

पंकित आणि प्राचीने 11 सप्टेंबर 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी पंकित फक्त 21 वर्षांचा होता. पंकित आणि प्राची यांच्या वयात बरंच अंतर असल्याने त्याच्या कुटुंबीयांकडून या लग्नाला विरोध करण्यात आला होता. प्राची ही पंकितपेक्षा वयाने आठ वर्षांनी मोठी असल्याचं कळतंय. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन पंकितने प्राचीशी लग्न केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या संसारात बरेच चढउतार आले. यादरम्यान दोघांनी समुपदेशनाद्वारे नातं सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही काहीच परिणाम होत नसल्याने अखेर त्यांनी वेगळं राहायचं ठरवलं.

2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत पंकित त्याच्या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. “आम्ही नामांकित काऊंन्सलरकडे गेलो, मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. हे लग्न वाचवण्यासाठी आम्ही जवळपास सर्व प्रयत्न केले. पण अखेर वेगळं राहूनच आम्हाला ती शांती आणि आनंद मिळाला. 2015 पासून आम्ही वेगळे राहतोय. यामुळे आता दोघंही आपापल्या आयुष्यात खुश आहोत. आम्ही दोघं आजही एकमेकांचा खूप आदर करतो आणि आमच्यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.”

पंकित आणि प्राचीला एक मुलगा असून घटस्फोटानंतर प्राचीला त्याचा ताबा मिळाला आहे. तर पंकितसुद्धा मुलाच्या संगोपनासाठी आवश्यक ती मदत करणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हे दोघं वेगळे राहत आहेत. त्यामुळे अखेर घटस्फोटामुळे त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम मिळाला आहे. पंकितने अनेक नामांकित मालिकांमध्ये काम केलंय. यामध्ये ‘कभी सौतन कबी सहेली’, ‘बरसातें – मौसम प्यार का’, ‘दिल मिल गए’ यांचा समावेश आहे. तर प्राचीने ‘कसौटी जिंदगी की’, ‘हवन’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.