AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिव्हर कॅन्सर सर्जरीनंतर दीपिकाची अशी अवस्था; मानेवरच्या खुणा पाहून नेटकरी चिंतेत

लिव्हर कॅन्सरच्या सर्जरीनंतर दीपिका कक्कर घरी परतली असून नुकत्याच एका व्लॉगद्वारे तिने तिच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. यावेळी दीपिकाने तिच्या मानेवरील काही खुणा दाखवल्या आहेत. या खुणा पाहून चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली.

लिव्हर कॅन्सर सर्जरीनंतर दीपिकाची अशी अवस्था; मानेवरच्या खुणा पाहून नेटकरी चिंतेत
Dipika Kakar Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 18, 2025 | 12:27 PM
Share

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली होती. नुकतीच तिच्यावर लिव्हर कॅन्सरची सर्जरी करण्यात आली. तब्बल 14 तासांच्या सर्जरीनंतर दीपिकाला काही तास आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 11 दिवस ती रुग्णालयातच होती. आयुष्यातील या सर्वांत कठीण काळात दीपिकाचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिम आणि तिच्या कुटुंबीयांनी तिची खूप साथ दिली. रुग्णालयात घालवलेल्या वेदनादायी दिवसांबद्दल दीपिका नुकतीच तिच्या व्लॉगमध्ये व्यक्त झाली. यावेळी तिने तिच्या मानेवरील खुणासुद्धा दाखवल्या आहेत.

सर्जरीनंतर दीपिका आता तिच्या घरी आली आहे. घरी आल्यानंतर 12 दिवसांनंतर दीपिकाने तिचे केस धुतले आणि मानेवरील खुणा चाहत्यांना दाखवल्या. दीपिकाच्या मानेवर छोट्या-छोट्या बऱ्याच खुणा दिसल्या. याविषयी ती म्हणाली, “आता मी ठीक आहे. 12 दिवसांनंतर मी माझे केस धुवू शकले. त्यामुळे मला आता खूप हलकं वाटतंय.” दीपिका आणि शोएबने व्हिडीओ शेअर करत याविषयीची माहिती दिली. सर्जरीनंतर हळूहळू दीपिकाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु पूर्णपणे ठीक व्हायला तिला अजूनही काही वेळ लागणार आहे.

सर्जरीनंतरही दीपिकाने तिच्या हॉस्पिटलच्या बेडवरून चाहत्यांशी संवाद साधला होता. तिच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल तिने सर्व चाहत्यांचे आभार मानले होते. चाहत्यांना तब्येतीविषयी सांगताना दीपिकाला अश्रू अनावर झाले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी ती म्हणालेली, “माझ्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. शोएबने सांगितल्याप्रमाणे मला खोकल्याचा त्रास जाणवत होता. खोकल्यामुळे माझ्या टाक्यांवर खूप ताण येत होता. पण आता मी पूर्वीपेक्षा खूप बरी आहे.” हे सांगतानाच दीपिकाला रडू कोसळतं, तेव्हा शोएब तिला आधार देतो. शस्त्रक्रिया झाल्यापासून ती खूप भावनिक झाल्याचं शोएब यावेळी चाहत्यांना सांगतो. छोट्या-छोट्या गोष्टींवरही तिला रडू कोसळतंय.

शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांनी 2018 मध्ये लग्न केलं. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शोएबशी लग्नानंतर दीपिकाने अभिनयातून ब्रेक घेतला. आंतरधर्मीय लग्नामुळे अनेकदा दीपिकाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.