Ekta Kapoor: एकता कपूरने करण जोहरवर साधला निशाणा, ‘तुम करो तो लस्ट स्टोरीज, हम करे तो..’

अल्ट बालाजीवरील बोल्ड कंटेटबद्दल एकता कपूरची पोस्ट; करण जोहरलाही सुनावलं

Ekta Kapoor: एकता कपूरने करण जोहरवर साधला निशाणा, 'तुम करो तो लस्ट स्टोरीज, हम करे तो..'
Ekta Kapoor and Karan JoharImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 11:05 AM

मुंबई: अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह (बोल्ड) कंटेट दाखवल्यामुळे निर्माती एकता कपूरला गेल्या काही दिवसांपासून टीकांचा सामना करावा लागतोय. गंदी बात, XXX, बेकाबू, रागिनी एमएमएस 2 यांसारख्या तिच्या सीरिज आणि चित्रपटांना सर्वोच्च न्यायालयानेही फटकारलं. तरुण पिढीला बिघडवण्याचं काम केलं जातंय, असं कोर्टाने एकताला सुनावलं. आता याप्रकरणी एकताने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने अप्रत्यक्षपणे निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर निशाणा साधला आहे.

एकताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिली आहे. ‘तुम करो तो लस्ट स्टोरीज और हम करे तो गंदी बात’, अशा शब्दांत तिने करण जोहरला सुनावलंय. त्याचसोबत ‘दुटप्पीपणा’ असा हॅशटॅग तिने या पोस्टमध्ये लिहिला आहे.

हे सुद्धा वाचा

2020 मध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘लस्ट स्टोरीज’ ही अँथॉलॉजी फिल्म प्रदर्शित झाली होती. यामध्ये चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कथा दाखवण्यात आल्या होत्या. या चारही कथा महिलांच्या कामुकतेवर भाष्य करणाऱ्या होत्या. यातील एक कथा करण जोहरने दिग्दर्शित केली होती. यावरूनच एकताने करणला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

अल्ट बालाजीवरील ‘XXX’ या सीरिजचं प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. “यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे. तुम्ही या देशाच्या युवा पिढीचा मेंदू दूषित करत आहात. ओटीटीवरील हा कंटेट सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना कोणता पर्याय देत आहात”, असा सवाल कोर्टाने एकता कपूरला केला होता. या सीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह दृश्ये दाखवल्याचा आरोप आहे.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.