AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेतील या 31 खेळाडूंकडे सामना संपण्याची ताकद, जाणून घ्या प्रत्येक संघाचे हुकूमाचे एक्के

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी प्रत्येक संघाने संघ बांधणी केली आहे. फलंदाज आणि गोलंदाजीचा जोरदार सराव सुरू आहे. पण संघाची खरी ताकद ही फिनिशरच्या खांद्यावर असते. चला जाणून कोणत्या संघाकडे कोण फिनिशर आहे ते...

IPL 2026 स्पर्धेतील या 31 खेळाडूंकडे सामना संपण्याची ताकद, जाणून घ्या प्रत्येक संघाचे हुकूमाचे एक्के
IPL 2026 स्पर्धेतील या 31 खेळाडूंकडे सामना संपण्याची ताकद, जाणून घ्या प्रत्येक संघाचे हुकूमाचे एक्केImage Credit source: PTI
| Updated on: Mar 21, 2026 | 6:00 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार 28 मार्चपासून क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे. पावर प्ले, मधली षटकं आणि अंतिम षटकांचा खेळ असे तीन महत्त्वाचे टप्पे असतात. या पावर प्लेमध्ये सामन्याची रूपरेषा काय ते कळते. पण फिनिशर सर्व काही धुळीस मिळवण्यात सज्ज असतात. कारण शेवटी जोरदार फटकेबाजी करून सामना फिरवण्याची ताकद या फलंदाजांमध्ये असते. धावांचा पाठलाग करताना फिनिशरची ताकद कळून येते. एका षटकात 30 हून अधिक धावांची गरज असली तर सामना फिरवण्याची ताकद या खेळाडूंमध्ये असते. अशी अनेक उदाहरणं आपण भुतकाळात पाहिली आहेत. आयपीएल 2026 स्पर्धेत असे 31 फिनिशर आहेत. हे 31 फिनिशर दहा संघात विभागले गेले आहेत. चला जाणून घेऊयात कोणत्या संघात कोण फिनिशर आहेत ते.

दहा संघातील फिनिशर

  1. आयपीएल 2026 स्पर्धेत कागदावरचा सर्वात मजबूत संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिलं जाते. या संघात हार्दिक पांड्या, नमन धीर आणि विल जॅक्स हे तीन मोठे फिनिशर आहेत.
  2. चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल स्पर्धेत पाच जेतेपदं मिळवली आहेत. या संघात आयपीएल 2026 स्पर्धेसाठी एमएस धोनी, शिवम दुबे, कार्तिक शर्मा आणि डिवाल्ड ब्रेव्हिस असे चार फिनिशर आहेत.
  3. गतिवजेत्या आरसीबी संघातही तीन मोठे फिनिशर आहेत. या तीन खेळाडूंकडे सामना फिरवण्याची ताकद आहे. यात टिम डेविड, जितेश शर्मा आणि रोमारियो शेफर्ड हे फिनिशर आहेत.
  4. दिल्ली कॅपिटल्स अजूनही आपल्या पहिल्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. या संघात तीन फिनिशर आहेत. डेविड मिलर, समीर रिझवी आणि आशुतोष शर्मा यांची नावं आहेत.
  5. सनरायझर्स हैदराबाद संघात एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. पण फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी लियाम लिव्हिंगस्टोन, हेनरिक क्लासेन, आणि अनिकेत शर्मा हे तीन खेळाडू सज्ज आहेत.
  6. राजस्थान रॉयल्सकडेही फिनिशरची काही कमी नाही. या संघात ओपनिंगला येणारा वैभव सूर्यवंशी सामना संपण्याची ताकद ठेवतो. पण फिनिशर म्हणून शिमरोन हेटमायर, शुभम दुबे आणि डोनोवन फरेरा ही नावं आहेत.
  7. गुजरात टायटन्सकडे तीन फिनिशर आहे. यात जेसन होल्डर, राहुल तेवतिया आणि ग्लेन फिलिप्स ही तीन नावं आहेत.
  8. लखनौ सुपर जायंट्समध्ये निकोलस पूरन, आयुष बदोनी आणि अब्दुल समद ही तीन नावं फिनिशर म्हणून आहेत.
  9. कोलकाता नाईट रायडर्समध्ये रिंकु सिंहसारखा तगडा फिनिशर आहे. त्याने हे अनेकदा सिद्ध केलं आहे. त्याची साथ रमनदीप सिंह आणि रिकार्डो पावेल देतील.
  10. पंजाब किंग्सचं जेतेपद मागच्या वर्षी फक्त सहा धावांनी हुकलं. पण शशांक सिंह शेवटी जोरदार फटकेबाजी केली. शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस आणि मार्को यानसेन हे तीन फिनिशर आहेत.

Follow Us
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...