OTT Movies : जूनमध्ये ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी, ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित

जूनमध्ये ओटीटीवर उत्तम चित्रपटाची मेजवानी मिळणार आहे. (Entertainment feast on OTT in June, amazing movies and web series to be screened)

OTT Movies : जूनमध्ये ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी, 'हे' चित्रपट होणार प्रदर्शित

मुंबई : कोरोनामुळे गेले अनेक दिस चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे निर्माते आपला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आता ओटीटी प्लॅटफॉर्मचा (OTT Platform) वापर करत आहेत. ओटीटीवर आता एक पेक्षा एक उत्तम चित्रपट प्रदर्शित होत असल्यानं चाहत्यांनाही घरी बसून चांगले चित्रपट पाहण्याची संधी मिळत आहेत. अशा परिस्थितीत जूनमध्ये ओटीटीवर उत्तम चित्रपटाची मेजवानी मिळणार आहे.

या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर उत्तम चित्रपट आणि वेबसीरीज पाहता येणार आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पहात होते. या महिन्यात चाहत्यांना शेरनी, स्केटर आणि द फॅमिली मॅन 2 असा खजिना मिळणार आहे. अशा परिस्थितीत या महिन्यात जूनमध्ये ओटीटीवर कोणते चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होतील हे जाणून घेऊया.

द फॅमिली मॅन 2 (Amazon Prime)

या महिन्याची सुरुवात मनोज भाजपाच्या शानदार वेबसीरीज द फॅमिली मॅन 2 ने झाली. सीरिजच्या पहिल्या मोसमाच्या यशानंतर चाहत्यांना दुसर्‍या भागाची बरीच प्रतीक्षा होती. ही सीरिज 4 जून रोजी रिलीज झाली. या वेब सीरिजमध्ये मनोज बाजपेयीसोबत समांथा अक्केनेनी आणि प्रियामनी मुख्य भूमिकेत दिसल्या आहेत.

अवेक (9 जून, नेटफ्लिक्स)

अवेक या चित्रपटात जीना रॉड्रिग्ज आणि एरियाना ग्रीनब्लाट मुख्य भूमिकेत दिसतील. हा चित्रपट एका घटनेवर आधारित आहे. एका घटनेनंतर जगातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे कार्य करणं कसे थांबवतात, सर्वकाही पुन्हा सामान्य कसं होतं हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट 9 जूनला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

लोकी (9 जून, डिज्नी + हॉटस्टार)

लोकी ​​’द गॉड ऑफ मिसचीफ’ चे चाहते या सिरीजची खूप प्रतीक्षा करत आहेत. ही वेबसिरीज 9 जूनला डिज्नी + हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. खास गोष्ट म्हणजे या वेळी वेबसिरीजमध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळेल, म्हणजेच मालिकेचे सर्व भाग एकाचवेळी प्रदर्शित होणार नाहीत, तर दर बुधवारी एक भाग सादर केला जाईल.

सनफ्लॉवर (11 जून, झी 5)

11 जून रोजी झीवर सनफ्लॉवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. मर्डर-मिस्ट्री वेब सीरिज चाहत्यांना खूप आवडणार आहे. या मालिकेत सुनील ग्रोव्हर, आशिष विद्यार्थी, रणवीर शोरे, गिरीश कुलकर्णी, आणि मुकुल चड्ढा दिसणार आहेत.

स्केटर (11 जून, नेटफ्लिक्स)

11 जूनला स्केटर प्रदर्शित होणार आहे, हा चित्रपट राजस्थानमधील एका मुली भोवती फिरताना दिसतो. या मुलीला स्केटबोर्डिंग चॅम्पियन व्हायचे या चित्रपटाचे दिग्दर्शन मंजरी मकझिनी यांनी केले आहे. या चित्रपटात वहीदा रहमानही दिसणार आहे.

फादरहुड (18 जून, नेटफ्लिक्स)

पॉल वेट्झ दिग्दर्शित ‘फादरहुड’ या महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI