‘लाफ्टर शेफ 2’ चे स्पर्धक गडगंज श्रीमंत, कोणाकडे 80 लाखाचं घड्याळ, तर कोणाकडे 50 कोटींचं घर
Laughter Chef 2 Contestants Expensive Things: 'लाफ्टर शेफ 2' चे स्पर्धक गडगंज श्रीमंत, प्रत्येक स्पर्धक जगतोय रॉयल आयुष्य... कोणाकडे 80 लाखाचं घड्याळ, तर कोणाकडे 50 कोटींचं घर, जाणून व्हाल थक्क

‘लाफ्टर शेफ 2’ सीझन कलर्स टीव्हीवर सुरु झाला आहे. यावेळी सीझनमध्ये अनेक ओळखीचे चेहरे आहे. रुबीना दिलैक पासून अंकिता लोखंडे आणि राहुल वैद्य याच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी शोमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसत आहेत. तर शोमधील प्रत्येक स्पर्धक रॉयल आयुष्य जगत आहे. त्यांच्या महागड्या वस्तूंच्या किंमती जाणून तुम्हीही हैराण व्हाल…
लाफ्टर शेफ 2 चे स्टार स्पर्धक अतिशय भव्य शैलीत आयुष्य जगतात. विकी जैन ते रुबिना दिलीकपर्यंत या शोच्या स्पर्धकांकडे अनेक महागड्या गोष्टी आहेत. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला महागड्या गाड्यांची आवड आहे.
View this post on Instagram
अंकिताच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. यामध्ये Porsche 718 Boxster, Jaguar XF सारख्या कारचा समावेश आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्री अत्यंत आलिशान आयुष्य जगते. सोशल मीडियावर अभिनेत्री रॉयल अंदाजात फोटो पोस्ट करत असते.
अभिनेता राहूल वैद्य देखील कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगतो. लाफ्टर शेफच्या शूटिंगदरम्यान पॅप्सशी बोलत असताना त्याने 80 लाख रुपयांचे घड्याळ फ्लाँट केलं होतं. अभिनेता कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.
अंकिता लोखंडेचा नवरा आणि बिग बॉस 17 चा स्पर्धक विकी जैन हा कोळसा व्यापारी आहे आणि खूप श्रीमंत आहे. त्याचे मुंबईत एक आलिशान पेंटहाऊस असून त्याची किंमत 50 कोटी रुपये आहे.
कॉमेडियन कृष्णा देखील गडगंज श्रीमंत आहे. कृष्णा याच्याकडे देखील गडगंज संपत्ती आहे. मुंबईतील वेगवेगळ्या भागांत त्याचे फ्लॅट आणि अपार्टमेंट आहेत. शिवाय त्याचं स्वतःचे फार्महाऊस देखील आहे. कृष्णाची पत्नी देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कश्मीरा शाह असं कृष्णाच्या पत्नीचं नाव आहे.
View this post on Instagram
बिग बॉस स्पर्धक अभिषेक कुमार देखील आलिशान आयुष्य जगतो. अभिषेक यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. , नुकताच त्याने 71 लाख रुपयांची कार खरेदी केली. अभिषेक याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो.
