अमिताभ बच्चन यांच्या भावाबद्दल माहितीये? वडिलांच्या निधनानंतर दोन्ही भावांमध्ये वाढला दुरावा… जया बच्चन यांच्यासोबतही वाद
Amitabh Bachchan and Family : अमिताभ बच्चन यांचा भावासोबत दुरावा... वडिलांच्या निधनानंतर बच्चन कुटुंबात वाढले वाद... जया बच्चन यांच्यासोबतही वाद... प्रतिष्ठित कुटुंबाचं काय आहे सत्य..., सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाची चर्चा...

Amitabh Bachchan and Family : जेव्हा बच्चन कुटुंहबाची चर्चा रंगते, तेव्हा काही ठकाविक चेहरे सर्वांच्या समोर येतात. महानायक अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन नंदा, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या चर्चा कायम सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अमिताभ बच्चन यांच्या आई – वडिलांबद्दल देखील अनेकदा चर्चा रंगतात. पण बिग बी यांच्या भावाबद्दल फार कोणाला माहिती नाही. बिग बी देखील कधी भावाचं नाव घेत नाहीत. बिग बी यांच्या भावाचं नाव अजिताभ बच्चन असं आहे. आज बिग बी जे काही आहेत त्यामागे त्यांच्या भावाचा खारीचा वाटा आहेत. पण वडिलांच्या निधनानंतर दोन्ही भावांमधील दुरावा आणखी वाढला. तर जया बच्चन यांचे देखील रमोला बच्चन यांच्यासोबत वाद होते. रमोला या अजिताभ बच्चन यांच्या पत्नी आहे.. दोन्ही भावांमधील मदभेद का वाढले याबद्दल घ्या जाणून.
वडील हरिवंश राय बच्चन यांच्या निधनानंतर दोन भावांमधील दुरावा वाढला
अजिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत, मोठा खुलासा केला होता. वडील हरिवंश राय बच्चन यांच्या निधनानंतर दोन भावांमध्ये दुरावा निर्माण झाला. असं अभिजात म्हणाले. दोघांमधील वाद टोकाला पोहचले होते… जे वडिलांच्या निधनानंतर आणखी वाढले. अजिताभ म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून मी परदेशात राहत आहे… एवढ्या लांब राहिल्यानंतर दुरावा तर येतोच… अमिताभ यांनी वडिलांना दुखवायचं नव्हतं. म्हणून त्यांनी वडिलांसाठी एकत्र राहण्याचा प्रयत्न केला आणि बराच वेळ एकत्र घालवला.’
अमिताभ बच्चन यांच्या नवीन मित्रांमुळे मतभेद झालेले? अजिताभ बच्चन काय म्हणाले?
मुलाखतीत अजिताभ यांना अमिताभ बच्चन यांच्या नवीन मित्रांमुळे मतभेद झालेले का? असा प्रश्न देखील विचारण्यात आलेला. यावर नकार देत अजिताभ म्हणाले, ‘यावर काहीही न बोलणं केव्हाही योग्य ठरेल… अमिताभ बच्चन याच्यासोबत तेव्हा दुरावा वाढण्यात आला, जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला.. जेव्हा राजकारणाशी संबंधित मित्र अमिताभ यांच्या आयुष्यात आले. त्यामुळे आता पुढे काय होत बघू…’ असं देखील अजिताभ म्हणालेले.
अजिताभ यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांना चार मुलं आहेत. त्यांच्या मुलांची नावे नयना बच्चन, भीम बच्चन, निलिमा बच्चन आणि नम्रता बच्चन अशी आहेत. बच्चन कुटुंबाची चर्चा कायम रंगत असते. अजिताभ यांचं संपूर्ण कुटुंब परदेशात राहतं.
