आर माधवन ते सुद्धा कल्याण फास्ट ट्रेनमध्ये? व्हिडीओ पाहून चाहते थक्क
Viral Video : चाहत्यांचा फेव्हरेट हिरो आर माधवर चक्क कल्याण फास्ट ट्रेनमध्ये? व्हिडीओ सर्वत्र होतोय तुफान व्हायरल... व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Viral Video : सोशल मीडियाच्या काळात कधी काय व्हायरल होईल काहीही सांगता येत नाही. यामुळे अनेकांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत देखील मोठी वाढ होते. आता देखील असंच काही झालं आहे… ज्यामुळे कल्याण फास्ट लोकलने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हुबेहूब अभिनेता आर माधवन याच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे… लोकलमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने गुपचूप टिपलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे…
मुंबईची लोकल म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन… याच लोकलने अनेकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोलाचं काम केलं आहे… मुंबईकरांचा प्रवास लोकलमुळे सुखकर होतो… मुंबई लोकलचे अनेक वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात… आता देखील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याच्या कॅप्शनमघ्ये ‘आज मला कल्याण फास्टमध्ये फरहान दिसला…’ असं लिहिलं आहे.
View this post on Instagram
फरहान म्हणजे ‘थ्री इडियट’ सिनेमात आर माधवन याने साकारलेली भूमिका… ‘थ्री इडियट’ सिनेमाला प्रदर्शित होऊन अनेक वर्ष झाली आहेत. पण लोकांच्या मनात आजही सिनेमातील भूमिका आणि आठवणी कायम राहिल्या आहेत… सिनेमानंतर आर माधवन याला फरहान याच नावाने ओळखतात… आर माधवन सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ समोर आल्यापासून त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘फरहान, जेव्हा अब्बा खरोखरच सहमत झाले नाही तेव्हा त्याने कॉर्पोरेट नोकरी स्वीकारली…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जेव्हा आर माधवन रोज वाडापाव खातो…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आंद्रे एस्टेबन यांच्याकडे इंटर्नशिप करण्यासाठी ब्राझिलियन रेनफॉरेस्टमध्ये गेला होता ना?’ व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे…
आर माधवन याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही… अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अर माधवन याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. नुकताच अभिनेता ‘दे दे प्यार दे 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला… सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेता कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो…
