AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ फेम अभिनेत्याचं 6 वर्षांनंतर मालिकेत कमबॅक; साकारणार खलनायक

'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' यांसारख्या ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेला अभिनेता तब्बल सहा वर्षांनंतर मालिका विश्वास पुनरागमन करतोय. 'नशिबवान' या नवीन मालिकेत तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' फेम अभिनेत्याचं 6 वर्षांनंतर मालिकेत कमबॅक; साकारणार खलनायक
farzandImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 11, 2025 | 2:22 PM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘नशिबवान’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही गोष्ट आहे गिरीजा नावाच्या मुलीची, जिच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत. आई-वडिलांचं प्रेम नाही, लहान वयातच आलेली घरची जबाबदारी आणि जगण्यासाठीचा संघर्ष असं खडतर आयुष्य गिरीजाच्या नशिबी आलंय. मात्र या कठीण प्रवासात ती नशिबवान आहे याचा उलगडा तिला होतो. गिरीजा नशिबवान का आणि कशी ठरते याची गुंफलेली सुंदर गोष्ट म्हणजे नशिबवान मालिका. या मालिकेतून प्रसिद्ध अभिनेता तब्बल सहा वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन करतोय. या अभिनेत्याने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. आता ‘नशिबवान’ या मालिकेत तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

या अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अजय पूरकर आहे. अजय पूरकर या मालिकेत खलनायक म्हणजेच नागेश्वर घोरपडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. नागेश्वर आपल्या पैशांच्या जोरावर सामान्य माणसांना त्रास देतो. खून करायलाही मागेपुढे बघत नाही. देवीची पूजा करतो. पण राक्षसारखा लोकांचा छळ करतो. इतका क्रूर वागूनही तो कधीच कोणत्या केसमध्ये अडकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Neha Naik (@neha_424)

हे खुनशी पात्र साकारणं किती आव्हानात्मक आहे हे सांगताना अजय पूरकर म्हणाला, “जवळपास 6 वर्षांनंतर मी मालिकेत काम करतोय. मला नागेश्वर हे पात्र ऐकताच क्षणी खूप आवडलं. एकतर स्टार प्रवाहसारखी नंबर वन वाहिनी आणि कोठारे व्हिजन्ससारखी निर्मिती संस्था असताना नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. महेश कोठारेंसोबत काम करण्याचं माझं स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होतंय. नागेश्वर या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. या पात्राच्या अनुषंगाने मालिकेची गोष्ट घडणार आहे. याआधी मी इतका प्रभावशाली खलनायक साकारलेला नाही. त्यामुळे नागेश्वर साकारताना अभिनेता म्हणून माझा कस लागणार आहे.”

अजय पूरकरने श्री शिवराज अष्टक फिल्म सीरिजमधील ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’मध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि तानाजी मालुसरे यांच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे ‘प्रेमाची गोष्ट’, ‘अग्ली’, ‘संघर्ष’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.