AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! प्रसिद्ध दिग्दर्शक राजामौलींवर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

Rajamouli : प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली हे अडचणीत सापडले आहेत. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी राजामौली यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती, त्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी! प्रसिद्ध दिग्दर्शक राजामौलींवर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?
rajamouli
| Updated on: Nov 18, 2025 | 8:11 PM
Share

प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली हे अडचणीत सापडले आहेत. राजामौली यांनी भगवान हनुमानाबाबत एक विधान केले होते, यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी राजामौली यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती, त्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने हा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवान हनुमानांबद्दल वादग्रस्त विधान

वाराणसी चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यावर प्रेक्षकांना संबोधित करताना राजामौली म्हणाले की, ‘मी देवावर विश्वास ठेवत नाही. माझ्या वडिलांनी सांगितलं की देव हनुमान सर्व गोष्टी सांभाळून घेतील. मला विचार करून खूप राग आला की अशा पद्धतीने गोष्टी सांभाळत आहेत का? माझी पत्नी हनुमानाची खूप मोठी भक्त आहे. ती अशा प्रकारे वागते, जणू ते तिचे मित्रच आहेत आणि ती त्यांच्याशी संवाद साधते. मला तिच्यावरही राग आला. जेव्हा माझ्या वडिलांनी हनुमानाविषयी सांगितलं आणि यशासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्याचा सल्ला दिला, तेव्हाही मला खूप राग आला.’

सोशल मीडियावर टीका

या कार्यक्रमानंतर राजामौली यांचे हे विधान सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले असून त्यांच्यावर सडकून टीका झाली आहे. लोकांनी या विधानाला धार्मिक भावनांचा अपमान आणि भगवान हनुमानाच्या श्रद्धेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्यांना सुनावलं आहे.

हिंदू सेनेकडून त्वरित कारवाईची मागणी

राजामौली यांच्या या विधानाची दखल घेत हिंदू सेनेने तक्रार दाखल केली होती. विष्णू गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, ‘भगवान हनुमानाबद्दल केलेल्या विधानामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत. या विधानामुळे सामाजिक आणि सामुदायिक सौहार्द बिघडू शकते. त्यामुळे असा लोकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात यावेत.’ त्यानंतर आता राजामौली यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...