AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवान राम कधीच… राजमौलींच्या त्या टिप्पणीमुळे मोठा वाद; प्रकरण अंगलट येणार?

‘वाराणसी’च्या टीझर लॉन्चमध्ये एसएस राजामौलींनी भगवान हनुमानावर केलेल्या टिप्पणीने खळबळ माजली आहे. आता त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रीय वानर सेनेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याच दरम्यान, 2011मध्ये राजामौलींनी केलेली एक जुनी पोस्ट पुन्हा व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनवी भगवान रामांबद्दल टिप्पणी केली होती.

भगवान राम कधीच... राजमौलींच्या त्या टिप्पणीमुळे मोठा वाद; प्रकरण अंगलट येणार?
rajamouliImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 18, 2025 | 5:33 PM
Share

साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत असणारा ‘वाराणसी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा भव्य टीझर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. टीझर लॉन्च दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने राजामौलींनी भगवान हनुमानावर टिप्पणी केली. त्यांच्या या टिप्पणीसोबतच 2011 मधील एक जुने ट्विटही व्हायरल होत आहे. इव्हेंटमध्ये वारंवार तांत्रिक समस्या आल्यानंतर राजामौलींनी सर्वप्रथम माफी मागितली आणि एक वैयक्तिक किस्सा सांगितला.

नेमकं प्रकरण काय?

एसएस राजामौलींनी आपले वडील आणि लेखक विजयेंद्र प्रसाद यांचा उल्लेख करत तेलुगूमध्ये सांगितला. “मला देवावर फारसा विश्वास नाही. माझे वडील आधी येऊन म्हणाले की हनुमान माझ्या पाठीशई उभे आहेत आणि मला मार्गदर्शन करत आहेत. हे ऐकताच मला राग आला. हे काय त्यांचे मार्गदर्शन आहे का?” असे ते म्हणाले. राजामौलींची ही टिप्पणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. अनेकांनी हा भगवान हनुमानाचा अपमान आहे असे देखील म्हटले.

हे सगळं सुरु असतानाच एसएस राजामौलींचे २०११ मधील एक जुने ट्विट पुन्हा ट्रेंड करू लागला आहे. ट्विटमध्ये लिहिले होते की त्यांना भगवान राम कधीच आवडले नाहीत आणि त्यांना भगवान कृष्ण सर्वात जास्त आवडतात. टीकाकारांनी ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर करत एक पॅटर्न असल्याचा दावा केला, तर काहींनी सांगितले की राजामौलींनी नंतर त्या विधानाचा संदर्भ स्पष्ट केला होता.

राष्ट्रीय वानर सेनेने एसएस राजामौलींविरुद्ध तक्रार दाखल केली

एसएस राजामौलींनी त्या पोस्टमध्ये पुढे लिहिले होते, “पण मला भगवान राम कधीच आवडले नाहीत. भगवान कृष्ण हे माझ्या सर्व अवतारांमध्ये आवडतात.” तसेच टीझर लाँच कार्यक्रमात राजामौली यांनी भगवान हनुमानावर केलेल्या टिप्पणीने राष्ट्रीय वानर सेनेने हैदराबादच्या सरूरनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. एसएस राजामौलींवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर एसएस राजामौलींच्या पुढील प्रकल्पाच्या बहिष्काराची मागणी करणारा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.