Friends: The Reunion | भारतात ‘फ्रेंड्स : द रियुनियन’चा नवा विक्रम, अवघ्या 9 तासांत मिळवले ‘इतके’ व्ह्यूज

‘फ्रेंड्स : द रियुनियन’ (Friends The Reunion)  90च्या दशकाचा आवडता शो ‘फ्रेंड्स’चा शेवटचा सीझन गुरुवारी प्रदर्शित झाला. फ्रेंड्सच्या नवीन सीझनबद्दल चाहते खूप उत्सुक झाले होते. हा शो भारतातही खूप पसंत केला जात आहे.

Friends: The Reunion | भारतात ‘फ्रेंड्स : द रियुनियन’चा नवा विक्रम, अवघ्या 9 तासांत मिळवले ‘इतके’ व्ह्यूज
फ्रेंड्स

मुंबई : ‘फ्रेंड्स : द रियुनियन’ (Friends The Reunion)  90च्या दशकाचा आवडता शो ‘फ्रेंड्स’चा शेवटचा सीझन गुरुवारी प्रदर्शित झाला. फ्रेंड्सच्या नवीन सीझनबद्दल चाहते खूप उत्सुक झाले होते. हा शो भारतातही खूप पसंत केला जात आहे. शोचा शेवटचा सिझन काल (27 मे) झी5 (Zee5) वर रिलीज झाला आहे आणि काही तासांतच त्याने भारतात एक नवीन विक्रम स्थापित केला आहे (Friends The Reunion makes record in india).

फ्रेंड्स रियुनियन पाहण्यासाठी चाहते खूप उत्साही होते. झी 5 वर याचा प्रीमियर होताच, लोकांनी त्याच वेळी तो पाहण्यास सुरुवात केली होती. इतकेच नाही, तर सोशल मीडियावर या शोविषयी भावनिक पोस्टही शेअर केल्या गेल्या. झीच्या डिजिटल बिझनेस प्रमुखांनी माहिती देताना म्हटले की, आतापर्यंत 1 दशलक्षाहून अधिक लोकांनी हा शो पाहिला आहे.

10 लाखांहून अधिक व्हू

झी डिजिटल बिझिनेस अँड प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष अमित गोयंका म्हणाले की, ‘फ्रेंड्स द रियुनियनला झी 5 वर खूप व्हूज मिळाले आहेत, याचा आम्हाला खूप आनंद झाला. यात 10 लाखाहून अधिक लोकांनी हा सिझन पाहिला आहेत आणि अद्याप ही मोजणी चालूच आहे. या शोच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी लाखो स्क्रीनवर हा शो प्ले केल्याचा आम्हाला अभिमान आहे.’(Friends The Reunion makes record in india)

तगडी स्टारकास्ट

104-मिनिटांच्या फ्रेंड्स द रियुनियनमध्ये जेनिफर एनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्वाइमर मुख्य भूमिकेत आहेत. यासह, जस्टीन बीबर, बीटीएस, जेम्स कॉर्डन, लेडी गागा, टॉम सेलेलक, जेम्स मायकेल टायलर, मॅगी व्हिलर, रीझ विदरस्पून आणि मलाला यूसुफजई पाहुण्यांच्या भूमिकेत दिसले आहेत.

ट्रेंडीगमध्ये नाव!

फ्रेंड्स द रियुनियनचा प्रीमियर होताच सोशल मीडियावर मिम्स आणि इमोशनल पोस्टची एक झुंड उमटली आहे. या शोचे चाहते पात्रांसह आपल्या मित्रांना या पोस्ट टॅग करत आणि त्यांच्या आठवणी जागवत आहेत. लाखों लोकांकडून हा कार्यक्रम आठवड्याच्या शेवटी देखील पाहिला जाईल, अशी अपेक्षा आहे. या शोचा टीझर रिलीज झाल्यापासून ट्रेंडमध्ये त्याने आपले स्थान पक्के केले आहे.

(Friends The Reunion makes record in india)

हेही वाचा :

बोल्ड सीन देऊन रातोरात स्टार झाली शिल्पा शिरोडकर,‘या’ कारणामुळे द्यावा लागला मनोरंजन विश्वाला निरोप!

Anurag Kashyap | आधी छातीत वेदना आता अँजियोप्लास्टी, अनुराग कश्यपने दिली स्वतःच्या तब्येतीची अपडेट