AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टेजवर येताच नुसत्या शिट्ट्या, कतरिनाच्या सुपरहिट गाण्यावर गौतमीचा धडाकेबाज डान्स, पहिलीच स्टेप पाहून प्रेक्षक थक्क

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या सुपरहिट गाण्यावर गौतमी पाटीलचा धडाकेबाज डान्स, स्टेजवर येताच चाहत्यांनी केला शिट्ट्यांचा वर्षाव, प्रत्येक स्टेप प्रेक्षकांना थक्क करणारी.

स्टेजवर येताच नुसत्या शिट्ट्या, कतरिनाच्या सुपरहिट गाण्यावर गौतमीचा धडाकेबाज डान्स, पहिलीच स्टेप पाहून प्रेक्षक थक्क
| Updated on: Apr 07, 2026 | 3:35 PM
Share

Gautami Patil : सोशल मीडियावर आपल्या हटके आणि एनर्जेटिक डान्समुळे कायम चर्चेत असलेली गौतमी पाटील पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी तिने बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या सुपरहिट गाण्यावर दमदार डान्स केला आहे.

‘चिकनी चमेली’ या गाण्यावर कतरिना कैफने केलेला डान्स आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याच गाण्यावर आता गौतमी पाटीलने स्वतःच्या स्टाइलमध्ये सादर केलेला डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गाणं सुरू होताच उपस्थित प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्यांचा वर्षाव करत गौतमी पाटीलच्या डान्सला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गौतमीच्या पहिल्याच स्टेप्स पाहून चाहत्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. तिच्या एनर्जी, एक्सप्रेशन आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने डान्स पाहण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक थक्क झाले.

गौतमीच्या व्हिडीओवर हजारो लाईक्स

या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. चाहत्यांनी कमेंट्समध्ये तिच्या डान्सचं कौतुक करत जबर्दस्त डान्स, फुल एनर्जी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर तिच्या डान्सची तुलना थेट कतरिना कैफच्या परफॉर्मन्सशीही केली आहे.

गौतमी पाटील तिच्या वेगळ्या डान्स स्टाइलमुळे आणि स्टेजवरील आत्मविश्वासामुळे नेहमीच चर्चेत असते. पारंपरिक आणि मॉडर्न डान्सचा संगम साधत ती प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सादर करण्याचा प्रयत्न करताना दिसते. या नव्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा तिच्या लोकप्रियतेत भर पडली असून, तिचा हा डान्स चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

सबसे कातिल गौतमी पाटील

गौतमी पाटील ही तिच्या नावापेक्षा तिच्या डान्समुळे प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलने बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या वादग्रस्त गाण्यावर डान्स केला होता. त्याची देखील प्रचंड चर्चा रंगली होती. तिच्या या डान्सने प्रचंड धुमाकूळ घातला होता. गौतमी पाटील माधुरीच्या गाण्यावर केलेला डान्स पाहून अनेकांनी तिच्या या डान्सचं प्रचंड कौतुक केलं होतं.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....