रितेशला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पाहून वैतागली जिनिलिया; त्या व्हिडीओवर अखेर सोडलं मौन
रितेश देशमुख आणि जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये रितेश दुसऱ्या अभिनेत्रीची गळाभेट घेऊन तिच्या हातावर किस करताना दिसला. त्यावेळी जिनिलिया त्या दोघांच्या बाजूलाच उभी होती.

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलियाचा तो व्हायरल व्हिडीओ तुम्हाला आठवतच असेल, ज्यामध्ये एका पुरस्कार सोहळ्यात रितेश एका अभिनेत्रीला मिठी मारतो आणि तिच्या हातावर किस करतो. त्यावेळी जिनिलिया त्याच्या बाजूलाच उभी असते. एका पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आजही त्यावरून मीम्स व्हायरल होतात. या व्हिडीओमध्ये रितेश हा अभिनेत्री प्रिती झिंटाची गळाभेट घेतो आणि तिच्या हातावर किस करतो. त्यानंतर दोघंही गप्पांमध्ये खूप व्यस्त होतात. हे सर्व बाजूला उभी असलेली जिनिलिया पाहत असते आणि त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्वकाही सांगून जातात. जिनिलियाला प्रचंड ईर्षा जाणवत होती, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या होत्या. त्या व्हिडीओवर आता जिनिलियाने प्रतिक्रिया दिली आहे.
‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत जिनिलिया म्हणाली, “त्या कॅमेरामनला मी सलाम करते. त्याने खूप चांगला अँगल पकडला होता. तो व्हिडीओ पाहून मला आजसुद्धा खूप हसायला येतं. मला हे सगळं खूपच गमतीशीर वाटतं. मी याबाबतीत खूप स्पष्ट आहे की मला रितेशची नंबर वन बनून राहायचं आहे. मला बाकी कोणत्याच गोष्टींची पर्वा नाही. आमच्यासाठी या सर्व गोष्टी खूप क्षुल्लक आहेत. आम्ही गेल्या 23 वर्षांपासून एकमेकांसोबत आहोत.”
View this post on Instagram
“अशा व्हिडीओंना अनेकदा गरजेपेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं. लोक काही ना काही बनवतच असतात. प्रिती झिंटाचा तो व्हिडीओ खूपच चांगला होता. कॅमेरामनने खरंच चांगलं काम केलंय. परंतु अनेक व्हिडीओ बकवास असतात. मला फरक नाही पडत. कारण त्यातून काहीच सिद्ध होत नाही. त्या गोष्टींना खूप वाढवून-चढवून दाखवलं जातं. त्यावेळी मी जरा थकलेले होते,” असंही तिने स्पष्ट केलं.
रितेश-जिनिलियाचा हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. 2019 मध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला होता. रेड कार्पेटवर जेव्हा अभिनेत्री प्रिती झिंटा समोर आली, तेव्हा रितेशने तिची गळाभेट घेतली. त्यानंतर हे दोघं एकमेकांशी गप्पा मारू लागले. तेव्हा बाजूलाच उभी असलेली जिनिलिया थोडीशी वैतागलेली दिसली.