AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाला धक्का! मुलगा आईसोबत करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण, कधी होणार चित्रपट रिलीज?

गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; आई सुनीताही पहिल्यांदाच मुलासोबत दिसणार मोठ्या पडद्यावर. कधी होणार चित्रपट रिलीज?

गोविंदाला धक्का! मुलगा आईसोबत करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण, कधी होणार चित्रपट रिलीज?
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 22, 2026 | 3:45 PM
Share

बॉलिवूडचा ‘हीरो नंबर वन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांच्या नात्याबाबत विविध बातम्या समोर येत असतानाच आहुजा कुटुंबासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा मुलगा यशवर्धन आहुजा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

यशवर्धनच्या पहिल्याच चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमात त्याची आई सुनीता आहुजा देखील त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे, सुनीता या चित्रपटात यशवर्धनच्या आईचीच भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे आई आणि मुलाची ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.

‘हीरो की हॉररइन’मधून यशवर्धनचा डेब्यू

यशवर्धनच्या पहिल्या चित्रपटाच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. ‘हीरो की हॉररइन’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा सिनेमा हॉरर-कॉमेडी प्रकारातील असून, चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर आणि अमर बुटाला करत आहेत. तर ‘हाउसफुल’ आणि ‘हिम्मतवाला’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले दिग्दर्शक साजिद खान या सिनेमाची धुरा सांभाळणार आहेत.

या चित्रपटात यशवर्धन आहुजासोबत ‘लापता लेडीज’ फेम अभिनेत्री नितांशी गोयल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नितांशीने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे यशवर्धन आणि नितांशीची ऑनस्क्रीन जोडी आणि त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

या दोघांव्यतिरिक्त जेमी लीवर, चंकी पांडे, बृजेंद्र काला आणि सिमरत कौर रंधावा यांसारखे कलाकारही या चित्रपटाचा भाग आहेत. ‘हीरो की हॉररइन’ हा चित्रपट 7 जानेवारी 2027 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

यशवर्धनच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत सुनीता आहुजा यांनी यापूर्वीच आनंद व्यक्त केला आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी सांगितले होते की, त्या यशवर्धनसोबत चित्रपटात काम करत आहेत आणि विशेष म्हणजे त्याच्याच आईची भूमिका साकारत आहेत.

सुनीता यांनी निर्माती एकता कपूर यांचेही कौतुक केले. यशवर्धनच्या चित्रपटात त्याच्या आईची भूमिका साकारण्याबाबत बोलताना त्यांनी आनंद व्यक्त केला आणि कदाचित इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच आई आणि मुलगा एकाच प्रोजेक्टमधून एकत्र लॉन्च होत असल्याचेही म्हटले होते.

Follow Us
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग
राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम करताय; विजय वडेट्टीवार....
राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम करताय; विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर हल्लाबोल
राहुल गांधींच्या कार्यक्रमात परदेशी फंडिंग... बड्या नेत्याचं विधान
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमात 9 ते 10 कोटी रुपये... बड्या नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ
पुण्यात मध्यरात्री राडा, त्या मुलीचा व्हिडीओ आला समोर, माफीचं सत्य...
COEP कॉलेज : पुण्यात मध्यरात्री राडा, त्या मुलीचा व्हिडीओ आला समोर, माफीचं सत्य काय?
आमदार अपात्रतेबाबत मी... शिवसेना सुनावणीवर विधानसभा अध्यक्षांचं विधान
आमदार अपात्रतेबाबत मी... शिवसेना सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया