गुलशन ग्रोवर यांचा सैफवर आरोप; म्हणाले “त्याच्या घरात माझे किमान 100..”

सैफवर का भडकले गुलशन ग्रोवर; मुलाखतीत केला लूक कॉपीचा आरोप

गुलशन ग्रोवर यांचा सैफवर आरोप; म्हणाले त्याच्या घरात माझे किमान 100..
Saif Ali Khan and Gulshan GroverImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 4:51 PM

मुंबई- अभिनेता गुलशन ग्रोवर (Gulshan Grover) बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखला जातो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गुलशनने अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांच्यावर लूक कॉपी केल्याचा आरोप केला आहे. खलनायकी भूमिका साकारण्यापूर्वी हे दोघं आपला लूक कॉपी करतात, असं गुलशन म्हणाले. सध्याच्या काळातील त्यांचा आवडता खलनायक कोण, असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर त्यांनी मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. इतकंच नव्हे तर जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्यामुळे मला प्रोजेक्ट्स मिळणं बंद झाले, असंही ते म्हणाले.

गुलशन ग्रोवर यांनी त्यांच्या करिअरमध्ये सर्वाधिक खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. रॉकी, सदमा, सोहनी महिवाल, खतरों के खिलाडी, राम लखन, सौदागर, कुर्बान, अनाडी, राजा बाबू, मोहरा, राजा की आएगी बारात, हेरा फेरी, सूर्यवंशी, सडक यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

तुमचा आवडता खलनायक कोण आहे, असा प्रश्न विचारला असता गुलशन म्हणाले, “मला माहीत आहे. हे सर्वजण (जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि सुनील शेट्टी) माझे चित्रपट पाहतात. अशात कोण माझा फेव्हरेट असू शकतो?”

हे सुद्धा वाचा

“जॅकी, संजय आणि सुनील माझ्या भूमिका करू लागले आहेत. त्यामुळे हल्ली मला प्रोजेक्ट्सच मिळत नाही”, असं ते पुढे हसत म्हणाले. यावेळी त्यांनी सैफ अली खानचाही उल्लेख केला. “सैफच्या घरी तर माझे 100 फोटो असतील. रोज माझा फोटो काढून विचार करत असेल की दाढी कशी वाढवू, डोळ्यांत काजळ कसं लावू, काय करू?”, असं ते म्हणाले.

सुनील शेट्टीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “सुनीलने तर लायब्ररी आणि फोटोंसाठी गुलशन ग्रोवर असा एक वेगळा सेक्शनच बनवला आहे. हे सर्वजण हेअर स्टायलिस्ट अलिम हकीमकडे जातात. अलिमकडे पण स्क्रॅपबुक असेल. तो स्वत: माझे चित्रपट पाहतो आणि त्यांना सांगतही नाही की तो गुलशन ग्रोवरची स्टाइल कॉपी करतोय.”

गुलशन ग्रोवर लवकरच ‘इंडियन 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये कमल हासन यांची मुख्य भूमिका आहेत. याशिवाय त्यांच्याकडे इतरही काही प्रोजेक्ट्स आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.