Dharmendra : ना बंगला, ना पैसा.. हेमा मालिनी यांच्या मुलीला धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीमधून हवीये ‘ही’ खास गोष्ट
Dharmendra : धर्मंद्र यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीमधून मुलीला हवंय तरी काय? मागितली 'ही' खास गोष्ट... धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या 6 मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे... सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांची चर्चा सुरु आहे.

Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांवर मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र यांनी मुंबई येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या 6 मुलांना मोठं दुःख झालं आहे. अशात धर्मेंद्र यांच्या जुन्या आठवणी आता समोर येत आहेत. दरम्यान, धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी अहाना देओल हिच्या एका मुलाखतील काही गोष्ट आता समोर येत आहे.. अहाना हिने सांगितलं होतं की, तिला वडिलांच्या प्रॉपर्टीमधून घर, संपत्ती काहीही नको… फक्त धर्मेंद्र यांची एक खास गोष्ट हवी आहे…
एका मुलाखतीत अहाना देओल हिने सांगितलं की. ‘जर माझ्या वडिलांच्या वारश्यातून मला काही मिळायचं असेल तर, मला त्यांची पहिली कार Fiat हवी आहे… ती कार प्रचंड क्यूट आणि विंटेज आहे आणि ती कार माझ्यासाठी फक्त एक गाडी नाही तर, त्या कारसोबत माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत…’
पुढे अहाना म्हणाली, ‘मी सहा वर्षांची होची… तेव्हा वडील लोनावळा येथे फार्म हाऊस आहे तेथे जात होतो… त्या आम्हाला बाय बोलत असताना ते अचानक थांबले… तेव्हा मी त्यांकडे हट्ट केला की मी सुद्धा येणार… हे सर्वकाही अचानक झालं होतं… त्यांनी माझी बॅग पॅक केली आणि मला सोबत घेऊन गेले…’
‘कारमध्ये त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवलं होतं… त्यांच्यासोबत माझी ही आठवण फार खास होती… ही आठवण मी कायम प्रेमाणे जपणार आहे…’ असं देखील अहाना म्हणाली होती. सांगायचं झालं तर, अहाना लाईमलाईट पासून दूर असते.
अहाना हिला मोठ्या पडद्यावर आई – वडिलांचा रोमान्स देखील आवडत नव्हता… यावर देखील अहाना हिने मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं.. ‘हे सत्य आहे मी जेव्हा लहान होती तेव्हा, मोठ्या पडद्यावरील आई – वडिलांचा रोमान्स मला आवडत नव्हता… मी गोंधळून जायची आणि मला राग देखील यायचा… माझी आई हेमा मालिनी मला कायम समजवायची, हा फक्त त्यांच्या कामाचा एक भाग आहे.. पण सुरुवातील मला फार कठीण वाटायचं…’, असं देखील अहाना म्हणाली होती.
अहाना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अहाना अभिनयापासून दूर आहे. अहाना तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत नसते. अहाना हिच्या पतीचं नाव वैभव वोहरा आहे.
