AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्रांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान, हेमा मालिनींनी पुरस्कार स्वीकारताच अहाना झाली भावूक

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते स्विकारला. मात्र, यावेळी मुलगी अहाना भावूक झाली.

धर्मेंद्रांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान, हेमा मालिनींनी पुरस्कार स्वीकारताच अहाना झाली भावूक
| Updated on: May 25, 2026 | 7:05 PM
Share

Dharmendra : 25 मे रोजी दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन स्वीकारला. या प्रसंगी संपूर्ण वातावरण अत्यंत भावूक झाले होते. हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांची मुलगी अहाना देखील उपस्थित होती. पुरस्कार स्वीकारताना हेमा मालिनी यांच्या चेहऱ्यावर धर्मेंद्र यांच्या आठवणींची वेदना स्पष्ट दिसत होती तर वडिलांना मिळालेला हा सन्मान पाहून अहाना आपल्या भावना आवरू शकली नाही आणि तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

समारंभादरम्यान अहानाचे पती वैभव वोहरा देखील तिच्यासोबत उपस्थित होते. पत्नी भावूक झाल्यावर त्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. या खास प्रसंगी हेमा मालिनी गुलाबी रंगाच्या साडीत अतिशय साध्या आणि देखण्या अंदाजात दिसत होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी धर्मेंद्र यांच्या वतीने पद्मविभूषण स्वीकारला. पुरस्कार स्वीकारताना त्या अत्यंत भावनिक झालेल्या दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर पतीला गमावल्याचे दुःख स्पष्ट जाणवत होते.

या सोहळ्यापूर्वी हेमा मालिनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, त्यांची दुसरी मुलगी ईशा देओललाही राष्ट्रपती भवनात उपस्थित राहायचे होते, मात्र काही कारणांमुळे ती येऊ शकली नाही. त्यांनी सांगितले की, हा संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय अभिमानाचा आणि तितकाच भावनिक क्षण आहे. धर्मेंद्र यांना मिळालेल्या या सन्मानामुळे संपूर्ण परिवार आनंदी असून सनी देओल आणि बॉबी देओल यांनाही याची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest and Breaking News on NDTV

300 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम

धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला अमूल्य योगदान दिले. जवळपास सहा दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या दमदार अभिनयासोबतच साधेपणामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवले. ‘शोले’, ‘फूल और पत्थर’, ‘अनपढ़’, ‘हकीकत’, ‘बंदिनी’, ‘सीता और गीता’, ‘मेरा गांव मेरा देश’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमुळे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली.

1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेला ‘इक्कीस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते अभिनय क्षेत्रात सक्रिय होते. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या अभिनयाची जादू आणि आठवणी कायम चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा