Hema Malini – Dharmendra : सवतीमुळे हेमा मालिनी यांच्या आयुष्यात अडचणी? ड्रीम गर्लचं मोठा खुलासा
Hema Malini - Dharmendra : हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र यांचं दुसरं लग्न... धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या बायकोचं स्थान... सवतीमुळे हेमा मालिनी यांच्या आयुष्यात अडचणी? मुलाखतीत अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

Hema Malini – Dharmendra : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याची चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील चर्चेचा विषय होता. पण जेव्हा दोघांनी समाजाच्याा विरोधात जात लग्न केलं तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला.. पहिला पत्नीला घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केलं… आज धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला जवळपास 46 वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या नात्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
एक मुलाखतीत हेमा मालिनी यांनी ‘मला जे हवं होतं, ते सर्व काही मिळालं नाही…’ असं म्हणत खंत व्यक्त केली. मुलाखतीत हेमा मालिनी यांना विचारण्यात आलं की, ‘तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी आहात? यावर उत्तर देत हेमा मालिनी यांनी अनेक खासगी गोष्टींचा खुलासा केला. ज्यामुळे हेमा मालिनी आयुष्यात तडजोड करत ही गोष्ट तर समोर आलीच..
मुलाखतीत हेमा यांनी ‘सवतीमुळे आयुष्यात काही अडचणी आल्या का?’ याबद्दल विचारण्यात आलं. यावर हेमा मालिनी नकार देत म्हणाल्या, आयुष्यात आपल्याला हवं ते सर्व मिळत नाही… ‘प्रेमात तुम्ही कायम समोरच्याचं मन सांभाळत असता. यामध्ये कोणत्याच अपेक्षा नसतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करता आणि अखेर त्या व्यक्तीकडून देखील तुम्हाला फक्त प्रेम मिळतं. अपेक्षा नसेल तर छोट्या – छोट्या गोष्टींमुळे आयुष्यात अडचणी येत नाहीत..’
पुढे हेमा मालिनी म्हणालेल्या, ‘एक व्यक्ती म्हणून काही गोष्टींचा आजही पश्चाताप होतो, पण ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. जेव्हा त्यांचा विचार करते, त्यांच्या भावनांचा विचार करते, तेव्हा सगळं काही ठिक वाटतं. त्यांची अनुपस्थिती देखील…’ सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांना वैवाहिक आयुष्यात अनेकदा तडजोड करावी लागली.
कशी आहे धर्मेंद्र यांची प्रकृती?
गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्यावर मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे… असं देखील कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे. धर्मेंद्र रुग्णालयात आहेत आणि त्यांच्यासोबत हेमा मालिनी आणि कुटुंबातील इतर सदस्य देखील आहेत.
