SSR Case to CBI | मुंबई पोलिसांच्या तपासात दोष नाही, तपास अतिशय चांगल्या पद्धतीने : गृहमंत्री

मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही. योग्य पद्धतीने तपास झाला, असे अनिल देशमुख (Anil Deshmukh On CBI For Sushant Singh Rajput) म्हणाले.

SSR Case to CBI | मुंबई पोलिसांच्या तपासात दोष नाही, तपास अतिशय चांगल्या पद्धतीने : गृहमंत्री
Follow us
| Updated on: Aug 19, 2020 | 6:37 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला. ही अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.  (Home Minister Anil Deshmukh On CBI For Sushant Singh Rajput)

“मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला. ही अभिमानाची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कलम 174 अंतर्गत जो तपास केला, त्यात कोणताही दोष आढळला नाही. योग्य पद्धतीने तपास झाला, असं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांबाबत ज्या पद्धतीने बोलत होते त्यावर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही. योग्य पद्धतीने तपास झाला.”

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेत संघराज्याची जी संकल्पना आहे त्याबाबत घटनातज्ज्ञांनी विचारमंथन करावं, असं मी सांगू इच्छितो. सीबीआयला तपास द्यावा की नाही, याबाबत राज्य सरकार निर्णय घेतो. राज्य सरकारने एनओसी दिली की तो तपास सीबीआयकडे जातो. पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यापद्धतीने राज्य सरकार सीबीआयला सहकार्य करेल.”

“या प्रकरणाचा विरोधी पक्षाचे नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारमध्ये पुढच्या काही काळात निवडणुका आहेत. या निवडणुका लक्षात घेऊन काही नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे,” असे अनिल देशमुख म्हणाले.

सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवली. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे कोर्टाने मान्य केले. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. “सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळताना कोर्टाने हा आदेश दिला. ही एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करुन बिहार पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे. (Home Minister Anil Deshmukh On CBI For Sushant Singh Rajput)

संबंधित बातम्या : 

मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.