निकाह नाही… सप्तपदी देखील नाहीत, हृतिक – सुझान यांच्या लग्नाबद्दल मोठं सत्य समोर
Hrithik Roshan and Sussanne Khan : हृतिक रोशन आणि सुझान खान यांचं लग्न तरी कसं झालं? निकाह नाही... सप्तपदी देखील नाहीत..., नक्की काय? घटस्फोटानंतर देखील दोघांच्या खासगी आयुष्याच्या रंगलेल्या असतात चर्चा...

Hrithik Roshan and Sussanne Khan : अभिनेता हृतिक रोशन आणि पूर्व सुझान खान यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाली आहेत. घटस्फोटानंतर ऋतिक आणि सुझान एकत्र मिळून मुलांचा सांभाळ करत आहेत. आज सुझान आणि हृतिक एकमेकांसोबत नसले तरी त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतात. एवढंच नाही तर, घटस्फोटानंतर देखील दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे… आता देखील ऋतिक आणि सुझान यांच्या लग्नाबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे..
सांगायचं झालं तर, नुकताच सुझान हिच्या आईचं निधन झालं आहे. हृतिक याच्या पूर्व सासूबाई झरीन खान यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्यावर मुस्लिम पद्धतीत नाही तर, हिंदू पद्धतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. झरीन खान पारसी होत्या आणि त्यांनी मुस्लीम धर्मातील संजय खान यांच्यासोबत लग्न केलं होतं.
झरीन आणि संजय यांची लेक सुझान हिच्यासोबत ऋतिक याने 2000 मध्ये लग्न केलं होतं. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, सुझान आणि हृतिक यांचा निकाह देखील झाला नाही आणि दोघांनी सप्तपदी देखील घेतल्या नाहीत. एका मुलाखतीत अभिनेत्याने लग्नाबद्दल मोठा खुलासा केलेला.
हृतिक म्हणालेला, ‘सुझान आणि मी आमच्या इच्छेने लग्न केलं होतं… आम्ही हिंदू पद्धतीत किंवा निकाह केला नाही… चर्चमध्ये लग्न व्हावं अशी आमची इच्छा होती. चर्चमध्ये होणारे लग्न फार छोटे आणि छान असतात… बेंगळुरू येथे आमचं लग्न झालं…’
View this post on Instagram
पुढे अभिनेता म्हणाला, ‘आशियातील सर्वांत मोठा स्विमिंग पूल.. किनारे.. आम्ही चालत पूलपर्यंत आलो आणि मध्यभागी शपथ घेतली आणि सही केली…’ अशा प्रकारे सुझान आणि ऋतिक यांचं लग्न झालं होतं… लग्नानंतर सुझान आणि हृतिक यांनी दोन मुलांचं जगात स्वागत केलं.. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सुझान आणि हृतिक यांनी लग्न केलं. पण दोघंचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर सुझान आणि हृतिक यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 14 वर्षांनंतर सुझान आणि ऋतिक यांचे मार्ग मोकळे झाले.
