धक्का देऊन पाडले, एकाने मागून वार केला… हुमा कुरैशीच्या भावाची हत्या कशी झाली? CCTV फुटेस आला समोर
दिल्लीतील निजामुद्दीन येथे अभिनेत्री हुमा कुरैशीच्या चुलत भावाची भयानक हत्या करण्यात आली आहे. आता या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, ज्यामध्ये आसिफ हल्लेखोरांचा सामना करताना दिसत आहे.

दिल्ली पुन्हा एकदा गुन्हेगारीने हादरली आहे. स्कूटी पार्किंगच्या किरकोळ वादातून अभिनेत्री हुमा कुरैशीचा भाऊ आसिफ याची गुरुवारी मध्यरात्री निजामुद्दीन येथे हत्या करण्यात आली. या खळबळजनक खुनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गंभीर जखमी झाल्यानंतरही आसिफ दोन्ही हल्लेखोरांशी लढत राहिला. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आरोपी उज्ज्वल आणि गौतम यांनी आसिफवर हल्ले केले.
निजामुद्दीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगपुरा भोगल बाजार लेनमध्ये रात्री साडे अकराच्या सुमारास स्कूटी पार्किंगवरून वाद सुरू झाला. याला वैयक्तिक रागाचे कारणही सांगितले जात आहे. यापूर्वीही आसिफ कुरैशी आणि हल्लेखोरांमध्ये पार्किंगवरून भांडण झाले होते. गुरुवारी मध्यरात्रीही असेच काहीसे घडले. वाद इतका वाढला की, आसपासच्या लोकांनी मध्यस्थी करण्यापूर्वीच उज्ज्वल आणि गौतम यांनी टोकदार वस्तूने आसिफ कुरैशीवर प्राणघातक हल्ला केला.
वाचा: मुकेश अंबानी यांना किती पगार मिळतो? सत्य जाणून तुम्ही थक्क व्हाल
Huma Qureshi Cousin: हुमा कुरेशीच्या भावाची हत्या कशी झाली? CCTV फुटेस आला समोर pic.twitter.com/KvoBmLB0at
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2025
हल्लेखोर आधीपासूनच हल्ल्याच्या तयारीत
सीसीटीव्ही फुटेज पाहता असे वाटते की, दोन्ही आरोपी आधीपासूनच मोठी घटना घडवण्याच्या तयारीत होते. आसिफच्या नातेवाइकांनुसार, घरासमोर स्कूटी पार्क केली होती, तेव्हा आसिफने सांगितले की, “भाऊ, स्कूटी बाजूला कर.” याच गोष्टीवरून वाद सुरू झाला आणि भांडणाला सुरुवात झाली. फुटेजमध्ये दिसत आहे की, मध्यस्थीच्या प्रयत्नांनंतरही आरोपींनी आसिफवर मारहाण सुरू केली.
एकाने पाडले, दुसऱ्याने केले वार
आसिफने एका हल्लेखोराला दूर केले होते, पण आजूबाजूला स्कूटर-बाईक असल्याने तो जमिनीवर पडला. इतक्यात दुसरा आरोपी मागून आला आणि त्याने आसिफच्या पोटात टोकदार वस्तूने वार करायला सुरुवात केली आणि लगेच हत्यार मागे लपवले. याचवेळी पहिला आरोपीही सतत वार करत राहिला. तरीही आसिफ पुन्हा उठला आणि दोघांचा सामना करत राहिला. एका आरोपीला त्याने इतक्या घट्ट पकडले की, त्याला सोडवणे कठीण झाले. पण तो यावेळी गंभीर जखमी झाला होता.
हल्ल्यानंतरही पश्चाताप नाही
आसिफला गंभीर जखमी केल्यानंतरही दोन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसला नाही, उलट ते रागात तिथेच उभे राहून धमक्या देत होते. इतकेच नाही, तर पुन्हा हल्ला करण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्नही ते करत होते. नंतर शिवीगाळ करत ते आपल्या घरी निघून गेले.
