विश्वासच बसत नाहीये… धर्मेंद्र यांच्या निधनापूर्वी काय घडलं? सायरा बानो यांनी असं काय सांगितलं?
Dharmendra Death : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी आज मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो या धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झाल्या होत्या. त्यांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी आज मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल विविध चर्चा या रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा उडाली होती. मात्र आता त्यांना जगाचा निरोप घेतला आहे. अनेक प्रमुख कलाकारांनी या अभिनेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी स्मशानभूमीकडे धाव घेतली होती. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो या धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झाल्या होत्या. त्यांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात.
धर्मेंद्र यांच्या निधनावर सायरा बानो काय म्हणाल्या?
सायरा बानो यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांना मोठा धक्का बसला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोतलताना सायरा बानो म्हणाल्या की, ‘धर्मेंद्र कुटुंबातील सदस्यासारखे होते; तो केवळ देखणाच नव्हता तर खूप चांगला माणूसही होता. तो बरा होत होता आणि त्याला व्हेंटिलेटरवरून काढून टाकण्याचीही चर्चा होती. पण जे घडले आहे त्यावर माझा विश्वास बसत नाहीये.’
या चित्रपटांमध्ये सायरा-धर्मेंद्रच्या जोडीने केले होते काम
धर्मेंद्र यांचे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्याशी खूप खास नाते होते. धर्मेंद्र यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत फक्त ‘अनोखा मिलन’ या चित्रपटात काम केले होते, मात्र त्यांनी सायरा बानो यांच्यासोबत साजीश, पॉकेटमार आणि ज्वारभाटा या चित्रपटांमध्ये काम केले होते. धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच सायरा बानो यांच्या डोळ्यात अश्रु पहायला मिळाले. यामुळे या दोघांमध्ये किती जवळीक होती हे स्पष्ट होत आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींनी घेतले अंत्यदर्शन
धर्मेंद्र यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आमिर खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार हे बॉलिवूड सेलिब्रिटी स्मशानभूमीत पोहोचले होते. या सर्वांसह बॉलिवूडमधीलही इतरही अनेक मान्यवर त्यांना अखेरचा निरोप द्यायला हजर होते. त्यामुळे या परिसरात पोलीसांचा मोठा फौजफाटा पहायला मिळाला.
