AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahrukh Khan : ‘दिल्लीला कधीही सोडू शकणार नाही’, शाहरुख खान आई-वडिलांच्या कबरीसमोर नतमस्तक

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुंबईत राहत असला तरीही त्याचं मन दिल्लीसाठी धडपडत असतं. ('I will never leave Delhi', Shahrukh Khan bows in front of parents' graves)

Shahrukh Khan : ‘दिल्लीला कधीही सोडू शकणार नाही’, शाहरुख खान आई-वडिलांच्या कबरीसमोर नतमस्तक
| Updated on: Mar 07, 2021 | 12:28 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुंबईत राहत असला तरीही त्याचं मन दिल्लीसाठी धडधडत असतं. त्याचं दिल्लीवरील प्रेम कधीच कमी होऊ शकत नाही हे नुकतंच दिसलं. शाहरुखनं आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून दिल्लीमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या पालकांच्या कबरीला भेट दिली. आई वडिलांच्या कबरीला तो नतमस्तक झाला. यादरम्यान किंग खान खूप भावनिक दिसत होता. (‘I will never leave Delhi’, Shahrukh Khan bows in front of parents’ graves)

व्हायरल भय्यानीनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे पाहायला मिळतंय आहे की शाहरुख आपल्या आई-वडिलांच्या कबरीकडे शांतपणे आपले हात जोडून उभा आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटात खूप व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी दुबईत चित्रिकरण पूर्ण करुण तो भारतात परतला आहे.

 मी दिल्लीला कधीच सोडू शकत नाही

शाहरुख खाननं आपल्या बर्‍याच मुलाखतींमध्ये दिल्लीशी असलेल्या त्याच्या खास नात्याविषयी सांगितलं आहे. तो म्हणतो,”जेव्हा मी दिल्लीला जातो तेव्हा मला वाटतं की माझे आई आणि वडील इथे आहेत.” मी त्यांच्या कबरीजवळ त्यांना भेटायला जातो. लोक म्हणतात की मी मुंबईचा माणूस झालो आहे,मी त्यांना कसं सांगू की माझे आई वडिल आहेत म्हणून मी दिल्लीला कधीही सोडणार नाही.’

आई वडिलांच्या कबरीजवळ जाताच दु:खी होतो

शाहरुखच्या वडिलांचं नाव मीर ताज मोहम्मद खान आणि आईचं नाव लतीफ फातिमा होतं. त्याचे वडील स्वातंत्र्यसैनिक आणि व्यवसायानं मुख्य अभियंता होते. शाहरुख कॉलेजमध्ये शिकत असताना त्याच्या वडिलांचा कर्करोगानं मृत्यू झाला होता. त्याच वेळी 1990 मध्ये त्याच्या आईचेही निधन झाले. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा शाहरुख दिल्लीला जातो तेव्हा तो आपल्या पालकांचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्कीच पोहोचतो.

व्हायरल होत आहेत फोटो

आदरांजली वाहण्यासाठी शाहरुख खान त्याच्या आई-वडिलांच्या कबरीजवळ पोहोचला. यावेळी त्यानं पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि काळा पँट परिधान केला होता. फोटोमध्ये तो आपल्या पालकांच्या कबरीसमोर गुडघे टेकलेला दिसत आहे. यावेळी तो शांत आणि दु: खी दिसत होता. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. काही लोक त्याच्याभोवती उभे देखील दिसतात.

संबंधित फोटो

Raam Setu : ‘रामसेतु’ चित्रपटासाठी खास तयारी, अक्षय कुमारनं शेअर केला पहिला फोटो

आदित्य ठाकरेंच्या वरळीत दिशा पटानीच्या चित्रपटाचं शुटिंग; मनसेच्या नेत्याने घेतला आक्षेप

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.