AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aashram | बॉबी देओल आणि प्रकाश झा यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने पाठवली नोटीस!

प्रकाश झा यांची वेब सिरीज 'आश्रम'च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी करणी सेनेने वेब या सीरीजवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

Aashram | बॉबी देओल आणि प्रकाश झा यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने पाठवली नोटीस!
| Updated on: Dec 14, 2020 | 5:34 PM
Share

मुंबई : प्रकाश झा यांची वेब सिरीज ‘आश्रम’च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी करणी सेनेने वेब या सीरीजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आश्रमविरूद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर आता जोधपूर कोर्टाने बॉबी देओल आणि प्रकाश झा यांनाही नोटीस पाठविली आहे. या दोघांना 11 जानेवारी रोजी सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच या वेब सीरीजचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला असून तिसर्‍या सीझनची तयारीही सुरू झाली आहे. (Increased difficulty for Bobby Deol and Prakash Jha)

View this post on Instagram

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

वकील खुश खंडेलवाल यांच्या याचिकेवर कोर्टाने हा आदेश दिला आहे. पण बॉबी देओल आणि प्रकाश झा यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यास कोर्टाने नकार दिला आहे. आता बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना 11 जानेवारीला कोर्टात जायला हजर राहवे लागणार आहे. करणी सेनेचे म्हणणे आहे की, या वेब सीरीजमध्ये हिंदू धर्माचा अपमान होत आहे. आता प्रकाश झा हे करणी सेनेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहण्यासारखे आहे.

दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भागही प्रेक्षकांना आवडला होता. यानंतर आता प्रेक्षक आश्रम या बेव सीरीजच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच प्रकाश झा यांनी आश्रम बेव सीरीजच्या यशाचे सेलिब्रेशन संपूर्ण टिमसोबत केले होते. प्रकाश झा यांनी सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचा फोटोही शेअर केले होते. ज्यात संपूर्ण टिम केक कापताना दिसत होते. फोटो शेअर करताना त्यांनी लिहले आहे की, ‘आश्रम’ ला एवढे प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद 900 मिलियन व्यूज मिळाले आहेत आणि अजुनही व्यूज मिळत आहेत. आश्रमच्या दुसरा भाग बाबा निराला काशीपूरच्या गुन्ह्यांभोवती फिरली आहे.

आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. त्याचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, करणी सेनेने यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. वादाचे कारण ‘आश्रम चॅप्टर-2’ या वेब सीरीजमध्ये आश्रमाची काळीबाजू दाखवली गेली आहे. अभिनेता बॉबी देओल याने या वेब सीरीजमध्ये ‘काशीपूरचा बाबा निराला’ हे पात्र साकारले आहे. ‘आश्रम’ची कथा ड्रग्ज, बलात्कार, नरसंहार आणि राजकारणाभोवती फिरत आहे. मालिकेत सनातन धर्माच्या बाबांना ढोंगी, भोगी, गुन्हेगार दाखवून सनातन धर्माची बदनामी केली जात आहे. केवळ धार्मिक भावना भडकवण्यासाठी या वेब सीरीजला ‘आश्रम’ असे नाव देण्यात आले आहे, असा आरोप हिमांशू यांनी केला होता.

संबंधित बातम्या :

Ashram Controversy | ‘आश्रम चॅप्टर-2’ मोठ्या वादात, जौनपूरमध्ये निर्माते प्रकाश झा-बॉबी देओलविरोधात याचिका

Entertainment | ओटीटीसह चित्रपटगृहात मनोरंजनाची मोठी मेजवानी, नवे चित्रपट आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित!

(Increased difficulty for Bobby Deol and Prakash Jha)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.