AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Entertainment | ओटीटीसह चित्रपटगृहात मनोरंजनाची मोठी मेजवानी, नवे चित्रपट आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित!

या आठवड्यात ओटीटी आणि चित्रपटगृहात मनोरंजनाची मोठी मेजवानी असणार आहे. या आठवड्यात ‘हे’ नवे चित्रपट आणि वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Entertainment | ओटीटीसह चित्रपटगृहात मनोरंजनाची मोठी मेजवानी, नवे चित्रपट आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित!
| Updated on: Dec 07, 2020 | 6:50 PM
Share

मुंबई : प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरीज (Movie and web series) प्रदर्शित केल्या जातात. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चित्रपटगृहांऐवजी अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यात भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांच्यात मोठी टक्कर होणार आहे. भूमीचा आगामी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असताना, कियारा अडवाणी आपला चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा धोका पत्करत आहे. या आठवड्यात ओटीटी आणि चित्रपटगृहात मनोरंजनाची मोठी मेजवानी असणार आहे. या आठवड्यात ‘हे’ नवे चित्रपट आणि वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत (Movie and web series release on ott platform and theatre in this week).

बेबाकी :

अभिनेता कुशल टंडनची वेब सीरीज ‘बेबाकी’ सीझन 1चा दुसरा भाग या आठवड्यात अल्ट बालाजीवर प्रदर्शित होणार आहे. प्रेम, आकर्षण आणि वेडेपणाची ही कहाणी 11 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीजमध्ये कुशालसह करण जोतवाणी, शिवज्योती राजपूत आणि सुचित्रा पिल्लई महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

श्रीकांत बशीर :

इंटेलिजेंसच्या एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न असणाऱ्या दोन गुप्तचर अधिकाऱ्यांची कहाणी सोनी लिवने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. हे अधिकारी एकत्र येऊन आपल्या देशाला दहशतवाद्यांपासून वाचवतात, अशी या वेबसीरीजची कथा आहे. या मालिकेत युधिष्ठिर सिंह, पूजा गौर, गश्मीर महाजनी आणि अश्मिता जग्गी या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘श्रीकांत बशीर’ ही वेब सीरीज 11 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दुर्गामती :

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा ‘दुर्गामती’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूमी पूर्णपणे वेगळी दिसणार आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता खूपच वाढली आहे. ‘दुर्गामती’ हा चित्रपट 11 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे (Movie and web series release on ott platform and theatre in this week).

लाहोर कॉन्फिडेंशियल :

‘लंडन कॉन्फिडेंशियल’च्या यशानंतर, ‘झी 5’ने आपली ‘लाहोर कॉन्फिडेंशियल’ ही थ्रिलर वेब सीरीज जाहीर केली आहे. ही वेब सीरीज 11 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत ऋचा चड्ढा, करिश्मा तन्ना आणि अरुणोदय सिंह महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल कोहली यांनी केले आहे.

टोरबाज :

संजय दत्तचा ‘टोरबाज’ हा नवीन चित्रपट या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा एका माणसाविषयी आहे ज्याने आपल्या मुलांना दहशतवादी कारवायांमध्ये हरवले आणि आता तो शरणार्थी शिबिरातील मुलांना चांगले जीवन देऊ इच्छित आहे. हा चित्रपट 11 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

इंदू की जवानी :

अभिनेत्री कियारा अडवाणीचा ‘इंदू की जवानी’ हा चित्रपट या आठवड्यात चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता आदित्य सील कियारा सोबत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार. आहे या चित्रपटात इंदू नावाची एक मुलगी लग्न करण्यासाठी एका चांगल्या मुलाच्या शोधात आहे. तिला एका स्टायलिश मुलाला डेट करायची इच्छा आहे. आणि त्यासाठी ती डेटिंग अ‍ॅपचा वापरही करते. हा चित्रपट 11 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. कियाराच्या या चित्रपटाला किती प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन बघणार, याकडे मनोरंजन विश्वाचे लक्ष लगून राहिले आहे.

(Movie and web series release on ott platform and theatre in this week)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.