Priyanka Chopra: लेकीसोबत ‘देसी गर्ल’ची धूमधडाक्यात दिवाळी; परदेशातही जपली भारतीय परंपरा
प्रियांका-निकच्या मुलीची पहिली दिवाळी; असं सजवलं लॉस एंजिलिसमधील घर

Priyanka Chopra, Nick JonasImage Credit source: Instagram
- बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही परदेशी राहत असली तरी भारतीय सण-उत्सव ती तिथेही जल्लोषात साजरी करताना दिसते. प्रियांकाने नुकतेच लॉस एंजिलिसच्या घरातील दिवाळी सेलिब्रेशनचे आणि पुजेचे फोटो पोस्ट केले आहेत.
- मुलगी मालतीसोबत प्रियांका आणि निक जोनासची ही पहिलीच दिवाळी आहे. यावेळी प्रियांकाने घरी खास पूजासुद्धा केली. घरातील दिवाळीची सजावट आणि भारतीय खाद्यपदार्थांची रेलचेल.. हे सर्व या फोटोंमध्ये स्पष्ट पहायला मिळतंय.
- या दिवाळीला प्रियांकाची आई मधू चोप्रासुद्धा लॉस एंजिलिसमध्ये होत्या. प्रियांका, निक आणि मालती यांनी पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोशाख केला होता. चिमुकल्या मालतीने लेहंगा आणि त्यावर साजेसं हेडबँड घातलं होतं.
- मालतीसोबत पुजेला बसतानाचा प्रियांकाचा हा खास फोटो. या फोटोंमध्ये प्रियांकाने मालतीचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही.
- लग्नानंतर प्रियांका परदेशी राहायला गेली, मात्र होळी असो किंवा दिवाळी.. प्रियांका आणि निक भारतीय पद्धतींनुसार हे सण-उत्सव उत्साहाने साजरा करताना दिसतात.
- प्रियांकाने सरोगसीद्वारे मुलीला जन्म दिला. मालती मारी चोप्रा जोनास असं तिचं नाव आहे. मुलीसोबतची ही पहिली दिवाळी प्रियांका-निकसाठी खूपच खास होती.
- वडे, ढोकळा, अळू वडी अशा भारतीय खाद्यपदार्थांची रेलचेल या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये पहायला मिळाली. खास प्रियांकाने हा मेन्यू निवडला होता.
- लेकीसोबतचा प्रियांकाचा हा खास पूलसाईड फोटो..








