AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra Nick Jonas : आणखी एका संसारात वादळ? प्रियांका चोप्राशी लग्न केल्याचा निकला पश्चात्ताप?

Priyanka Chopra Nick Jonas : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे हॉलिवूड आणि बॉलीवूडचे क्यूट कपल आहे. या जोडप्याच्या लग्नाला 5 वर्षं झाली आहेत. दोघांनाही एक मुलगी आहे. पण लग्नाच्या इतक्या वर्षांनी निक जोनासला त्याच्या भव्य लग्नाचा पश्चाताप होत आहे.

Priyanka Chopra Nick Jonas : आणखी एका संसारात वादळ? प्रियांका चोप्राशी लग्न केल्याचा निकला पश्चात्ताप?
| Updated on: Feb 07, 2024 | 3:25 PM
Share

मुंबई | 7 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही प्रियांका चोप्राचं नाव गाजत असतं. तर तिचा पती आणि प्रसिद्ध गायक निक जोनास हा हॉलिवूडप्रमाणेच इथेही खूप प्रसिद्ध आहे. नुकताच निक जोनास आणि त्याचे भाऊ, जोनास ग्रुप हे भारतात कॉन्सर्टसाठी आले होते, त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. फोटो, व्हिडीओही व्हायरल झाले. प्रियांका आणि निकच्या लग्नाला आत पाच वर्ष झाली आहेत. त्या दोघांनीही डिसेंबर 2018 मध्ये राजस्थानमध्ये थाटामाटात भव्य लग्न केलं. त्यासाठी त्यांनी जोधपूरमध्ये एक पॅलेस बुक केला होता जिथे त्यांनी भारतीय तसेच ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याने भारतात त्यांच्या लग्नावर 3.5 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला. पण लग्नाच्या पाच वर्षानंतर निक जोनासला आता पश्चाताप होत असल्याचे समोर आले आहे. इतक्या वर्षांनी त्याच्या मनातील गोष्ट ओठांवर आली आहे. निक जोनासला त्याच्या भव्य लग्नाबद्दल खूप पश्चाताप होत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या ग्रँड लग्नाबद्दल सांगितले.

अलीकडेच निक हा त्याचे भाऊ केविन आणि जो जोनाससोबत एका शोमध्ये सहभागी झाला होता. जिथे त्याला लाय डिटेक्टरमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले.  ‘तुझ्या लग्नादरम्यान कधीही, तुला असं वाटलं का, की बास झालं आता बाबा हे लग्न ! असं तुला कधी वाटलं का ? असा प्रश्न निकला विचारण्यात आला होता. त्यावर निकने मोठ्याने हसत ‘हो’ असं उत्तर दिलं. तो म्हणाला, ‘हो, विशेषतः बिल पाहिल्यानंतर, मला असं नक्कीच वाटलं.’ आता निकच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे की, त्याला त्याच्या भव्य लग्नाच्या बिलाबद्दल पश्चाताप वाटत आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

निक-प्रियांकाने सोडलं राहतं घर

प्रियांका आणि तिचा पती निक जोनास हे 2019 पासून लॉस एंजिलिसमधल्या ज्या स्वप्नांच्या घरात राहत होते, त्यातून अखेर बाहेर पडले . प्रियांका-निकचं हे घरं आता राहण्यालायक राहिलेलं नाही. घरात ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने दोघांनी या घरात न राहण्याचं ठरवलं. इतकंच नव्हे तर ते सध्या घराच्या विक्रेत्याविरोधात कायदेशीर लढाई लढत आहेत. 2019 मध्ये प्रियांका-निकने हे घर तब्बल 20 दशलक्ष डॉलर्सना विकत घेतलं होतं. प्रियांका-निकने मे 2023 मध्ये या घराच्या विक्रेत्याविरोधात खटला दाखल केला आहे. कारण घर खरेदी केल्यापासूनच स्विमिंग पूल आणि स्पा भागात विविध समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या, असा आरोप त्यांनी केला .

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.