शहाणपणा करू नकोस, अक्कल नाही का? छोटा पुढारीवर भडकली जान्हवी किल्लेकर; नेमकं काय घडलं?
जान्हवी किल्लेकरने नुकतंच जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घेतलं. यावेळी तिच्यासोबत अभिनेता ओम यादव आणि कुटुंबीयसुद्धा होते. मात्र या व्हिडीओवरून वेगळीच कमेंट करता जान्हवी छोटा पुढारीवर चिडली. तिने थेट कमेंट बॉक्समध्येच त्याला सुनावलं.

‘बिग बॉस मराठी 5’ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर तिच्या बेधडक आणि रोखठोक स्वभावामुळे अनेकदा चर्चेत असते. नुकताच तिचा जेजुरी दर्शनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी भरभरून प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. यामागचं कारण म्हणजे जान्हवी जेजुरीच्या दर्शनाला अभिनेता ओम यादव आणि कुटुंबीयांसोबत गेली होती. नेटकरी या दोघांच्या नात्यावरून कमेंट्स करत असतानाच ‘बिग बॉस मराठी’ फेम छोटा पुढारीनेही संधी साधली. त्यानेही या व्हिडीओवर अशी कमेंट केली, जे वाचून जान्हवीचा पारा चांगलाच चढला होता. तिने कमेंट्समध्येच छोटा पुढारीला सुनावत म्हटलं, ‘जास्त शहाणपणा करू नकोस.’
नेमकं काय घडलं?
अभिनेता ओम यादव आणि कुटुंबीयांसोबत जान्हवी नुकतीच जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेली होती. यावेळी जान्हवी आणि ओमने एकत्र भंडारा उधळला आणि देवाचं दर्शन घेतलं. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अखेर ओम यादवला कमेंटमध्येच स्पष्टीकरण द्यावं लागलं. ‘अतिउत्सुक कमेंट करणारे अरे थांबा थांबा. कन्फ्युज होऊ नका. आम्ही फक्त एकमेकांना सपोर्ट करणारे फक्त आणि फक्त बेस्ट फ्रेंड आहोत आणि कायम राहू. इव्हेंटनिमित्त महाराष्ट्रभर आम्ही जात असतो. त्या त्या भागातील देवस्थानात आम्ही दर्शन घेत असतो. तसंच जेजुरीलादेखील देवदर्शन केलं. जान्हवीचं पूर्ण कुटुंबदेखील यावेळी सोबत होतं. आमची मैत्री एकदम क्लिअर आहे. कलाकार म्हणून आमचा एकमेकाना कायम सपोर्ट असतो आणि यापुढेही असेल,’ असं त्याने स्पष्ट केलं.
जान्हवी आणि ओम यादवचा व्हिडीओ
View this post on Instagram
या कमेंट्सच्या गर्दीत छोटा पुढारीनेही जान्हवी आणि ओमचं नाव एकमेकांसोबत जोडलं. ‘ओम दादा हे बरोबर नाही बरं. तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे. मी तुमचा लहान भाऊ आहे, त्यामुळे मला काय बोलायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल. पण देवाला आमचा एक निरोप द्या. आम्हाला पण एक वहिनी आली पाहिजे आता’, अशी कमेंट छोटा पुढारीने केली. त्यावर ओमने अत्यंत समजुतदारपणे त्याला उत्तर दिलं. पण जान्हवी मात्र त्याच्यावर चांगलीच चिडली. ‘नक्कीच घनश्याम. तू लग्न केलंस की मी लगेच करणार लग्न. प्रॉमिस’, असं ओम म्हणाल. तर चिडलेल्या जान्हवीने लिहिलं, ‘जास्त शहाणपणा करू नकोस. लोकांचं ठीक आहे, पण तुला अक्कल नाही का?’ तिच्या या कमेंटनंतर नेटकऱ्यांनीही छोटा पुढारीला ट्रोल केलं.
