‘जय मल्हार’मध्ये बानू साकारलेली ईशा केसकर आता एका नव्या भूमिकेत

अभिनेत्री ईशा केसकरनं अत्यंत कमी वेळात टीव्ही मालिकांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. मालिकांसोबतच ‘गर्लफ्रेंड’या चित्रपटातून तिचा अनोखा अंदाज चाहत्यांना दिसला. आता पुन्हा एकदा ईशा छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. आगामी 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेत ती भूमिका साकारणार आहे.

'जय मल्हार'मध्ये बानू साकारलेली ईशा केसकर आता एका नव्या भूमिकेत
Isha KeskarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 8:47 PM

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : ‘जय मल्हार’ या मालिकेत बानुबया, ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये शनायाची भूमिका साकारून अभिनेत्री ईशा केसकरने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप सोडली. आता बऱ्याच महिन्यांनंतर ईशा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेतून ईशा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती कला खरे ही भूमिका साकारणार असून तिचा वेगळाच अंदाज चाहत्यांना पहायला मिळणार आहे. ईशाची स्टार प्रवाह वाहिनीसोबत ही पहिलीच मालिका आहे.

या मालिकेविषयी बोलताना ईशा म्हणाली, “सध्या नवरात्रौत्सवाची धूम आहे. या मंगलमय वातावरणात माझ्या नव्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये मी कला खरेची भूमिका साकारतेय. नावाप्रमाणेच ती उत्तम कलाकार असते. हातकाम, रंगकला आणि चित्रकलेची तिला फार आवड असते. ती देवीची मूर्ती आणि दागिने घडवते. अंबाबाईच्या देऊळाबाहेर तिचं दागिन्यांचं दुकान असतं. स्वत:च्या हाताने ती सर्व पारंपरिक दागिने घडवते. संपूर्ण कोल्हापूर शहरात तिचे दागिने प्रसिद्ध असतात.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

“सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या कलाला गरीब-श्रीमंत असा भेदभाव केलेला आवडत नाही. हे पात्र प्रत्येकाला आपलंसं वाटेल असं आहे. आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. हेच प्रेम कला आणि आमच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेलाही मिळेल याची मला खात्री आहे. या मालिकेत मला अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळतेय. किशोरी अंबिये माझ्या आईची भूमिका साकारत आहेत. किशोरी ताईंसोबत मी याआधीही काम केलं आहे. या मालिकेसाठी आम्ही कोल्हापुरातल्या अनेक प्रसिद्ध ठिकाणी शूट करत आहोत,” अशा शब्दांत ईशाने भावना व्यक्त केल्या.

ईशाची ही नवीन मालिका येत्या 20 नोव्हेंबरपासून रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका आता नव्या वेळेत म्हणजेच रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

Non Stop LIVE Update
BIG BREAKING : मुंबईच्या भाजप कार्यालयाला भीषण आग; नेमकं काय घडलं?
BIG BREAKING : मुंबईच्या भाजप कार्यालयाला भीषण आग; नेमकं काय घडलं?.
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?.
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका.
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार.
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.