Video : जॉन अब्राहम-इमरान हाश्मीचा ‘मुंबई सागा’चा टीझर पाहिला का?

जॉन अब्राहम (John Abraham) आणि इमरान हाश्मीच्या (Emraan Hashmi) 'मुंबई सागा' (Mumbai Saga) या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत.

Video : जॉन अब्राहम-इमरान हाश्मीचा 'मुंबई सागा'चा टीझर पाहिला का?

मुंबई : जॉन अब्राहम (John Abraham) आणि इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) ‘मुंबई सागा’ (Mumbai Saga) या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अ‍ॅक्शन सीन दिसत आहेत. या चित्रपटात जॉन अब्राहम अंडरवर्ल्ड डॉनच्या भूमिकेत आहे तर इमरान हाश्मी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. (John Abraham-Emraan Hashmi’s ‘Mumbai Saga’ teaser release)

टीझर पाहून हे लक्षात येते की, चित्रपटात धमाका बघायला मिळणार आहे. चित्रपटात जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त सुनील शेट्टी, महेश मांजरेकर आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहेत. ‘मुंबई सागा’ चे लेखक आणि दिग्दर्शक संजय गुप्ता आहेत. भूषण कुमारने हा चित्रपट तयार केला आहे. ‘मुंबई सागा’ 19 मार्च 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

जॉन अब्राहम सध्या‘अटॅक’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. त्याने सत्यमेव जयते 2 चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात जॉनसोबत दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने 12 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय जॉन शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणसोबत पठाण चित्रपटातसुद्धा दिसणार आहे.

इमरान हाश्मी चेहरे या चित्रपटात दिसणार आहे. मंगळवारीच चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. इम्रानबरोबर अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. दोघेही पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसतील.

संबंधित बातम्या : 

Drishyam 2 : पुन्हा सस्पेन्स, पुन्हा रोमांच; दृश्यम-2 ची तयारी सुरु!

‘या’ बॉलिवूड अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल!

Sunny Leone | सनी लिओनीच्या कार नंबरचा दुरुपयोग, मुंबईत तरुणाविरोधात गुन्हा

(John Abraham-Emraan Hashmi’s ‘Mumbai Saga’ teaser release)

Published On - 12:31 pm, Thu, 25 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI