Video | जुही चावलाचं गायन कौशल्य पाहून सुष्मिता सेनही झाली अवाक्, पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर जुही चावलाचा खूप जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण जुही चावला हिला गाणे गाताना पाहू शकता. प्रेक्षकांमध्ये बसलेली सुष्मिता सेन देखील जुही चावलाचा आवाज ऐकून आश्चर्यचकित झाली आहे.

Video | जुही चावलाचं गायन कौशल्य पाहून सुष्मिता सेनही झाली अवाक्, पाहा व्हिडीओ
जुही आणि सुष्मिता
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 10:10 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) हिने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने जुही चावलाने देशातील सर्व लोकांना वेड लावले होते. यानंतर जूहीने एकामागून एक अनेक हिट चित्रपटांत काम केले. ‘डर’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘इश्क’, ‘दर’, ‘बोल राधा बोल’ यासारख्या बर्‍याच सिनेमांसाठी जुही चावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनय कौशल्यानंतर एका शोमध्ये कित्येक वर्षानंतर प्रेक्षकांना गाणाऱ्या जुही चावलाची छुपी प्रतिभा बघायला मिळाली (Juhi Chawla Hidden talent singing video goes viral on internet).

सध्या सोशल मीडियावर जुही चावलाचा खूप जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण जुही चावला हिला गाणे गाताना पाहू शकता. प्रेक्षकांमध्ये बसलेली सुष्मिता सेन देखील जुही चावलाचा आवाज ऐकून आश्चर्यचकित झाली आहे. तिने या गाण्याच्या कौशल्याबद्दल जुहीचे कौतुकही केले.

पाहा जुही चावलाचा व्हिडीओ

पुरस्कार सोहळ्यात जुहीचे गायन

अभिनेत्री जुही चावलाचा हा व्हिडीओ 2004च्या झी सिने पुरस्कार सोहळ्या दरम्यानचा आहे. यावेळी तिने ‘कल हो ना हो’ चित्रपटाचा टायटल ट्रॅक गायला. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की जुही चावला जेव्हा गात असते, तेव्हा करण जोहर तिच्या बरोबरीने स्टेजवर उभा आहे. जुहीला इतक्या छान गाताना पाहून करण जोहरच्या भूवयाही उंचावल्या. या पुरस्कार सोहळ्यात जुहीची छुपी प्रतिभा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले (Juhi Chawla Hidden talent singing video goes viral on internet).

लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

याक्षणी, जुही चावलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर ती शेवट सोनम कपूर स्टारर फिल्म ‘एक लडकी को देखा’मध्ये दिसली होती. या चित्रपटात जुहीने अनिल कपूरच्या ‘लेडी लव्ह’ची भूमिका केली होती. या चित्रपटामध्ये राजकुमार राव देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. जुही चावलाच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे तर ती ‘शर्माजी नमकीन’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटासाठी यापूर्वी ऋषी कपूरला कास्ट केले गेले होते, पण गेल्या वर्षी त्यांच्या निधनानंतर आता परेश रावल हा चित्रपट करणार आहेत. परेश रावल यांनी स्वतः याची पुष्टी केली आहे.

याशिवाय जुही चावला यांची मुलगी जान्हवी मेहता देखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा ऐकू आहेत. तथापि, जुही चावला यांनी अद्याप याची कोणतीही पुष्टी केलेली नाही.

(Juhi Chawla Hidden talent singing video goes viral on internet)

हेही वाचा :

बिग बींवर लागला होता दंगल भडकवल्याचा आरोप, श्री अकाल तख्त साहिबला लिहिलेले जुने पत्र व्हायरल!

Arijit Singh | प्रख्यात पार्श्वगायक अरिजीत सिंहच्या आईचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.