Kajol : काजोलने पुन्हा मोडला ‘तो’ नियम; ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ चर्चेत
Kajol : काजोलने पुन्हा एकदा तिच्या करिअरमधील मोठा नियम मोडला असून 'द ट्रायल 2'मधील तिचा किसिंग सीन व्हायरल झाला आहे. यामध्ये ती ऑनस्क्रीन पती जिशू सेनगुप्ताला किस करताना दिसतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kajol : अभिनेत्री काजोलने ‘द ट्रायल’ या वेब सीरिजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं. या सीरिजचा दुसरा सिझन नुकताच जियो हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये काजल पुन्हा एकदा वकिलाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नोयोनिका सेनगुप्ताची भूमिका तिने अत्यंत दमदार पद्धतीने साकारली होती. आता या दुसऱ्या सिझनमधील तिचा एक सीन चर्चेत आला आहे. या सीनमध्ये काजोल तिच्या ऑनस्क्रीन पतीला किस करताना दिसतेय. काजोलने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हा तिने ‘नो किसिंग पॉलिसी’चा नियम पाळला होता. ती तिच्या कोणत्याच चित्रपटात किसिंग सीन करत नव्हती. परंतु ओटीटीवर आल्यानंतर तिने या नियम बाजूला सारला आहे.
काजोलचा पहिला लिपलॉक सीन 2023 मध्ये ‘द ट्रायल’च्या पहिल्या सिझनमध्ये पहायला मिळाला. या सिझनमध्ये तिने ऑनस्क्रीनला किस केलं होतं. आता या सीरिजचा दुसरा सिझन आला आहे आणि यातसुद्धा काजोलचा किसिंग सीन आहे. या सीरिजच्या शेवटच्या एपिसोडमध्ये काजोल तिच्या ऑनस्क्रीन पतीला किस करताना दिसून येते. तिचा हा सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जीशू आणि काजोल यांचा अत्यंत भावनिक सीन दाखवण्यात आला आहे. त्यानंतर दोघं एकमेकांना किस करतात.
View this post on Instagram
काजोलने तिच्या आतापर्यंतच्या 29 वर्षांच्या करिअरमध्ये कधीच किसिंग किंवा इंटिमेट सीन केला नव्हता. अशा प्रकारचे सीन्स करण्यासाठी मी कम्फर्टेबल नाही, असं तिने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. परंतु काळानुसार काजोलने तिच्या नियमांमध्येही बदल केल्याचं दिसतंय. ‘द ट्रायल’ या वेब सीरिजबद्दल बोलायचं झाल्यास, याचे एकूण सहा एपिसोड्स आहेत.
‘द ट्रायल’च्या पहिल्या सिझनमध्ये नोयोनिका सेनगुप्ता (काजोल) तिच्या कुटुंबासाठी आणि दोन मुलींचं संगोपन करण्यासाठी तिच्या वकिलीच्या करिअरचा त्याग करते. परंतु जेव्हा तिचा पती राजीव सेनगुप्ता (जिशू सेनगुप्ता) एका स्कँडलमध्ये अडकतो आणि त्याला तुरुंगात पाठवलं जातं, तेव्हा तिच्या आयुष्यात मोठं वळण येतं. समोर दुसरा कोणताही पर्याय नसल्याने नोयोनिका वकिली विश्वात परतते. आता दुसऱ्या सिझनमध्ये नोयोनिका आणखी खंबीर आणि आत्मविश्वासू वकील झाली आहे. ती आता हाय प्रोफाइल केसेससुद्धा सहजपणे सांभाळू शकतेय. या दुसऱ्या सिझनच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
