KRK vs SRK | कमाल खानचा किंग खानशी मोठा पंगा, सोशल मीडियावर लीक केली ‘पठाण’ची कथा!

शाहरुखच्या कमबॅक फिल्मचा मोठा धमाका करण्यासाठी दिग्दर्शक व्यस्त झाले आहेत. दरम्यान, स्वत:ला नंबर वन समीक्षक म्हणणार्‍या कमाल आर खानने या बहुचर्चित चित्रपटाची कहाणी लीक केली आहे.

KRK vs SRK | कमाल खानचा किंग खानशी मोठा पंगा, सोशल मीडियावर लीक केली ‘पठाण’ची कथा!
केआरके आणि एसआरके

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ‘पठाण’ चित्रपटातून तो पुनरागमन करत आहे. अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुखच्या कमबॅक फिल्मचा मोठा धमाका करण्यासाठी दिग्दर्शक व्यस्त झाले आहेत. दरम्यान, स्वत:ला नंबर वन समीक्षक म्हणणार्‍या कमाल आर खानने या बहुचर्चित चित्रपटाची कहाणी लीक केली आहे (Kamal R Khan leaked shah rukh khan upcoming film pathan story on social media).

केआरकेने ट्विटद्वारे या चित्रपटाची कहाणी चाहत्यांना सांगितली आहे. त्यांनी प्रथम ट्विट केले की, ‘एसआरकेने गेल्या 3-4 वर्षांपासून कोणताही चित्रपट केलेला नाही. म्हणून मला वाटले की, तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी एक विलक्षण कथा निवडेल. पण पठाणची कहाणी अशी आहे की, एसआरके रॉचा एजंट, जॉन अब्राहम रशियन माफिया आणि दीपिका पादुकोण पोलिस अधिकारी बनले आहेत. यानंतर, एसआरके असा विचार करत आहे की, त्याचा हा चित्रपट हिट होईल, खरोखरच तो याविषयी विचार करत आहे का?’

वाचा KRKचे ट्विट

पुढे केआरकेने आणखी एक ट्विट केले, ‘तो हा चित्रपट करत आहे, कारण दिग्दर्शकाची शेवटची फिल्म वॉर कोणत्याही कथेविना सुपरहिट झाली होती. पण, त्यांना हे समजून घेण्याची गरज आहे की लोक कथा नाही, तर तरुण स्टार टायगर श्रॉफ आणि उत्तम नर्तक हृतिक रोशनला पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले होते. मात्र, शाहरुख खानचा चित्रपट कथेशिवाय बघायला लोकांना आवडणार नाही.’ (Kamal R Khan leaked shah rukh khan upcoming film pathan story on social media)

आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘बँग बँग, वॉर आणि काही इंग्रजी अ‍ॅक्शन चित्रपट पाहा, पठाणमध्ये ही दृश्य पाहायला मिळतील. हा चित्रपट फ्लॉप होणार आहे. एसआरकेची सर्वात मोठी समस्या ही आहे की, तो अमिताभ बच्चन नव्हे तर हृतिक आणि टायगरशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे.’

पठाणमध्ये सलमान खानदेखील दिसणार!

‘पठाण’ चित्रपटात सलमान खान एक कॅमिओ करणार आहे. सलमान खानने स्वत:च्या ‘बिग बॉस 14’ या शोमध्ये या वृत्ताला दुजोरा दिला होता. सलमानचे चाहतेही यासाठी खूप उत्सुक आहेत. सलमानने सांगितले होते की, लवकरच तो शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर मोस्ट अवेटेड फिल्म ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

शाहरुख खानच्या आगामी पठाण चित्रपटाच्या शूटिंगला सलमान खानने सुरुवात केली आहे. या चित्रपटात सलमानची छोटी भूमिका असली, तरी तो लवकरच त्याचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे. ‘यशराज फिल्म्स’ च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. सिद्धार्थ आनंद चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

प्रदर्शन लांबणीवर!

या वर्षाच्या सुरूवातीला शाहरुखने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्याने शेवटी म्हटले होते की, 2021मध्ये आपण मोठ्या पडद्यावर भेटू. हा व्हिडीओ असल्याने त्याच्या पुनरागमनाबद्दल चाहते देखील खूप उत्सुक झाले होते. पण, आता रिलीजची तारीख लांबणीवर गेल्यामुळे चाहते खूप निराश झाले आहेत. आता हा चित्रपट 2022मध्ये प्रदर्शित होणार आहे.

(Kamal R Khan leaked shah rukh khan upcoming film pathan story on social media)

हेही वाचा :

RHTDM 2 | ‘रहना है तेरे दिल में’चा सिक्वेल, दिया-माधवनला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न फेल

प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात, ‘या’ खास व्यक्तीशी बांधली लग्नगाठ!

Published On - 2:03 pm, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI