Thalaivi | लवकरच ‘थलायवी’ प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

थलयवी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट जयललीता यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला प्रदर्शित केला जाणार आहे. (kangana ranaut thalaivi movie release date april)

Thalaivi | लवकरच 'थलायवी' प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' तारखेला होणार प्रदर्शित
थलायवी चित्रपटाचे पोस्टर
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 11:07 PM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतची (Kangana Ranaut) मुख्य भूमिका असलेला आणि राजकीय नेत्या जयललीता यांच्या जीवनावर आधारित असलेला थलायवी (Thalaivi) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट जयललीता (Jayalalithaa) यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला प्रदर्शित केला जाणार आहे. ही महिती कंगना रनौतने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. (kangana ranaut starrer thalaivi movie will release on 23 april)

थलायवी तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार 

कंगना रनौतची मुख्य भूमिका असल्यामुळे मागील कित्येक दिवसांपासून थलायवी चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो, असे कंगनाच्या चाहत्यांना झाले होते. विशेष म्हणजे हा चित्रपट राजकीय नेत्या जयललीता यांच्या जीवनावर आधारलेला असल्यामुळे या चित्रपटाची सध्या विशेष चर्चा आहे. अनेकजन हा चित्रपट पाहण्यासाठी उस्तुक आहेत. मात्र, आता या चित्रपटासंदर्भातील प्रेक्षकांची उत्सुकता आता संपणार आहे. कारण हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये जयललीता यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट एकाच वेळी वेगवेगळ्या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये थलायवी चित्रपट प्रदर्शित होणा आहे.

एम. जी. आर म्हणून अरविंद स्वामी भूमिका साकारणार

या चित्रपटात एम. जी. रामचंद्रन यांची व्यक्तिरेखा अरविंद स्वामी यांनी साकारलेली आहे. त्यांच्या या व्यक्तिरेखेचा एक लूक सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. अरविंद स्वामी यांच्या नव्या लूकची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती. त्यांनतर आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे ठरले असून 23 एप्रिलला रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

दरम्यान, हा चित्रपट ए. एल. विजय यांनी दिग्दर्शित केला असून विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश सिंग यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. एकूण तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे या चित्रपटात नेमके काय असणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच, या चित्रपटात जयललीता यांच्या जीवनाच्या कोणत्या पैलूंचा उलगडा केला होणार?, हेही या चित्रपटात पाहणे महत्वाचे ठारणार आहे.

इतर बातम्या :

Thalaivi | ‘थलायवी’ चित्रपटातील अरविंद स्वामीच्या लूकची जोरदार चर्चा!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.