शीख समाज देशाची जान आणि शान, कंगनाचे नवे ट्वीट…

शीख समाज देशाची जान आणि शान, कंगनाचे नवे ट्वीट...

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या हिंसाचारावर अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) टीका केली होती.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 06, 2021 | 2:19 PM

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या हिंसाचारावर अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) टीका केली होती. आंदोलक शेतकऱ्यांना जेलमझध्ये टाका आणि त्यांची संपत्ती जप्त करा, म्हणणारी कंगना आता शिखांना देशाची जान आणि शान म्हणताना दिसत आहे. कंगना रनौत शेतकरी विरोधकांविरोधात सतत ट्विट करत असते. दरम्यान, आता कंगनाने आणखी एक ट्विट केले आहे, ज्यात तिने शिखांना राष्ट्रवादी मित्र म्हणत संदेश दिला आहे. (Kangana Ranaut tweeted about the farmers’ movement)

तसेच कंगनाने ट्विटसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये एक शीख तरुण असा दावा करीत आहे की, जे कृषी विधेयकाचा निषेध करत आहेत ते घाणेरडे राजकारण करीत आहे आणि ते बदमाश लोक आहेत. हा व्हिडिओ तिच्या ट्विटरवर तिने शेअर केला.  क्रिकेटपटूंविरोधात आपत्तीजनक ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटरने कारवाई केली होती.

ट्विटरने तिच्या दोन पोस्ट डिलीट केल्या असून सामाजिक तेढ निर्माण होईल, असं ट्विट न करण्याची तंबीही ट्विटरने कंगनाला दिली होती. त्यामुळे कंगनाचं अकाउंट पुन्हा बॅन केलं जाण्याची जोरदार चर्चा रंगली होती. देशात शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यावर ट्विटरवरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. क्रिकेटपटू रोहित शर्मानेही ट्विट करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

त्यावर कंगनाने आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्यामुळे ट्विटरन कंगनाच्या या ट्विटची दखल घेऊन त्यावर कारवाई केली होती. ट्विटरने कंगनाच्या दोन्ही पोस्ट डिलीट केल्या आहेत. कंगनाने नियमांचा भंग केल्याचं कारण देत ही कारवाई करण्यात आली होती. कंगनाने ज्या पद्धतीने भाषेचा वापर केला आहे. ती या प्लॅटफॉर्मसाठी योग्य नाही. आमच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्विट्सवरच आम्ही कारवाई केली आहे, असं ट्विटरने म्हटलं होत.

संबंधित बातम्या : 

रिलीजआधीच कमाईत बाप, बाहुबलीचा बाप ठरत असलेली फिल्म RRR बद्दल जाणून सर्व काही !

कोरोना काळातही रणवीर सिंहची कमाई वाढली, 9 नवीन ब्रँडने केला करार!

Love Hostel | बॉबी देओलच्या चित्रपटाला शेतकरी आंदोलनाचा फटका!

(Kangana Ranaut tweeted about the farmers’ movement)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें