खिशात फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला होता, ‘हा’ व्यक्ती आज आहे 300 कोटींचा मालक
मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते. मुंबईने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. अनेकांना स्टार बनवले आहे. आज आपण अशाच एका सुपरस्टारची कहाणी जाणून घेणार आहोत.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. तसेच मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते. त्यामुळे देशभरातून दररोज हजारो लोक मुंबईत दाखल होत असतात. काहीजण कामाच्या शोधात येतात, तर काहीजण बॉलिवूडमध्ये हिरो बनण्यासाठी मुंबईची वाट धरतात. मुंबईने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. अनेकांना स्टार बनवले आहे. आज आपण सर्वात यशस्वी कॉमेडी किंग कपिल शर्माची माहिती जाणून घेणार आहोत, जो फक्त 1200 रुपये खिशात घेऊन मुंबईत आला होता, मात्र आता त्याची संपत्ती 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
कॉमेडी किंग कपिल शर्मा हा पंजाबमधील अमृतसरचा रहिवासी आहे. त्याचे वडील पंजाब पोलिसमध्ये होते, मात्र कपिल लहान असतानाच त्यांचे निधन झाले. कपिलला गायक बनण्याची इच्छा होती, मात्र नशिबाने त्याला कॉमेडीकडे वळवले. तो थिएटरमधील नाटकांमध्ये काम करु लागला, त्याला चांगली ओळख मिळायला लागली, त्यानंतर त्याला अमृतसरमधील एका कॉलेजमध्ये मोफत प्रवेश मिळाला. मात्र कॉलेज पूर्ण करण्याआधीच तो मुंबईला आ पदवी पूर्ण करण्यापूर्वीच तो त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईला निघून गेला.
ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजपासून करिअरची सुरुवात
समोर आलेल्या माहितीनुसार कपिल शर्मा 1200 रुपये घेऊन मुंबईत आला होता. सुरुवातीला त्याला काम मिळाले नाही. तो अमृतसरला परतला व त्याने ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ साठी ऑडिशन दिली, मात्र त्याच्या पदरी निराशा आली, त्याची निवड झाली नाही. त्याने हार न मानता पुन्हा दिल्लीत जाऊन ऑडिशन दिली. यात त्याची निवड झाली आणि तो शोचा विजेताही बनला. या शोमुळे तो रातोरात प्रसिद्ध झाला. त्याने शोमधून मिळालेल्या पैशांतून बहिणीचे लग्न केले. त्यानंतर त्याने अनेक कॉमेडी शो केले आणि त्याला यश मिळत गेले.
कपिलने कालांतराने ‘के९’ नावाने प्रोडक्शन हाऊस सुरू केले. याद्वारे त्याने ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ शो सुरु केला. हा शो बंद झाल्यानंतर त्याने ‘द कपिल शर्मा शो’ सुरू केला, जो सुपरहिट झाला. या काळात त्याने 2015 मध्ये ‘किस किस को प्यार करूं’ या चित्रपटातही काम केले.
कपिल शर्माची संपत्ती किती?
अहवालांनुसार, कपिलची एकूण संपत्ती सुमारे 330 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे व्होल्वो XC90 आणि मर्सिडीज बेंझ S350 CDI या आलिशान गाड्या आहेत. तो दरवर्षी 15 कोटी रुपयांचा कर भरतो. पंजाबमध्ये त्यांचे 25 कोटी रुपयांचे आलिशान फार्महाऊस आणि मुंबईत 15 कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे अशी माहितीही समोर आलेली आहे.
