AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kartik Aaryan | ‘मेहनत की कमाई’, कार्तिक आर्यनने वाकून केला Lamborghiniला नमस्कार! पाहा व्हिडीओ…

अलीकडेच कार्तिक आर्यनने नवीन लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली असून, त्याच्या या गाडीची किंमत तब्बल साडेचार कोटी रुपये इतकी आहे. कार्तिक जेव्हा आपली गाडी घेऊन रस्त्यावर आला तेव्हा त्याने या दरम्यान असे काहीतरी केले, जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

Kartik Aaryan | 'मेहनत की कमाई', कार्तिक आर्यनने वाकून केला Lamborghiniला नमस्कार! पाहा व्हिडीओ...
कार्तिक आर्यन
| Updated on: Apr 08, 2021 | 12:55 PM
Share

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा सध्या बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता बनला आहे. त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीची सध्या बातमी बनते. अलीकडेच कार्तिक आर्यनने नवीन लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली असून, त्याच्या या गाडीची किंमत तब्बल साडेचार कोटी रुपये इतकी आहे. कार्तिक जेव्हा आपली गाडी घेऊन रस्त्यावर आला तेव्हा त्याने या दरम्यान असे काहीतरी केले, जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. बुधवारी, कार्तिक आर्यन त्याच्या नवीन लॅम्बोर्गिनीसोबत स्पॉट झाला. जेव्हा तो गाडीतून खाली उतरला, तेव्हा कोणी आपल्या मोठ्यांकडून आशीर्वाद घेतो, त्याप्रमाणे त्याने गाडीला वाकून नमस्कार केला (Kartik Aaryan touch new Lamborghini video goes viral).

कार्तिकने चक्क खाली वाकून लॅम्बोर्गिनीचा आशीर्वाद घेतला. जणू काही तो एखाद्या मोठ्या माणसाच्या पायाला स्पर्श करत आहे. कार्तिक आर्यनचा लॅम्बोर्गिनीसमोर वाकून नमस्कार करण्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, कार्तिक आर्यन आपल्या गाडीतून खाली उतरला आणि आपल्या मित्राच्या घराकडे चालला आहे. दरम्यान, तो मागे वळून नंतर आपल्या कारकडे गेला आणि काहीसा वाकून तिच्या पाया पडला.

पाहा व्हिडीओ

कार्तिकची ही अदा कॅमेरात कैद करण्यासाठी कॅमेरामनने त्याला पुन्हा एकदा असे करण्यास सांगितले. मग, कार्तिकने कॅमेरामनसाठी खूप चांगले पोज दिले आहेत. कार्तिकचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांनी खूप पसंत केला आहे.

जेव्हा कार्तिकने ही कार खरेदी केली तेव्हा त्याने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. हा एक गमतीशीर व्हिडीओ होता, ज्यात कार्तिकने असे कॅप्शन लिहिले होते की, ‘मी ती विकत घेतली… पण मी बहुधा या महागड्या वस्तूंसाठी बनलेलो नाही’.

बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. तो बर्‍याचदा वेगवेगळ्या कारमधून फिरताना दिसतो. तर कधीकधी तो बुलेटवरही दिसतो. कार्तिकने साडेचार कोटींची लॅम्बोर्गिनी कार विकत घेतली आहे. ही कर भारतीय नसून, त्याने थेट इटलीमधून भारतात आणली आहे. कार्तिकने त्याच्या स्वप्नातली कार इटलीहून मुंबईत आणण्यासाठी 50 लाख रुपये अतिरक्त कर भरले आहेत आणि तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याला त्याच्या गाडीची डिलिव्हरी मिळाली आहे(Kartik Aaryan touch new Lamborghini video goes viral).

गाड्यांचे कलेक्शन

या व्यतिरिक्त कार्तिककडे स्वतःच्या मालकीची बीएमडब्ल्यूची गाडी आहे, जी त्याने 2017मध्ये खरेदी केली होती आणि नुकतीच  2019मध्ये कार्तिकने आपल्या आईला मिनी कूपरच्या कार भेट म्हणून दिली, जी त्याच्या आईची आवडती कार आहे. 2017पासून कार्तिकच्या कारकीर्दीने जोर धरला. आजच्या घडीला कार्तिक बॉलिवूडच्या महागड्या कलाकारांपैकी एक आहे.

कोरोना काळात पाहत होता एकता कपूरच्या मालिका!

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर कार्तिक आर्यनने स्वत:ला क्वारंटाईन केले होते. तो आपला मोकळा वेळ सोशल मीडियावर सक्रिय राहण्यात घालवत होता. चाहत्यांसाठी पोस्ट शेअर करण्याबरोबर तो टीव्हीवर मालिका पहात होता. त्याबद्दल त्यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली होती. एकता कपूरची ‘कुम कुम भाग्य’ ही मालिका पाहत कार्तिकने स्वतःचा वेळ घालवला.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, कार्तिक आर्यन कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्यासह आगामी ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. चित्रपटाचे दिग्दर्शक अनीज बाझमी कार्तिकच्या लवकरच परत येण्याची वाट पहात होते, जेणेकरून पुन्हा शूटिंग सुरू होऊ शकेल. आता कार्तिक ‘भूल भूलैया 2’ च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. याशिवाय त्यांचा ‘धमाका’ हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. कार्तिक जान्हवी कपूरसोबत करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’मध्येही दिसणार आहे.

(Kartik Aaryan touch new Lamborghini video goes viral)

हेही वाचा :

Video | वारा आला नि ड्रेस उडाला, अभिनेत्री दीपिका झाली ‘Opps Moment’ची शिकार!

Kangana Ranaut | मुव्ही माफियांच्या भीतीने अक्षय कुमारने केला सीक्रेट कॉल, कंगनाचा अजब दावा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.