AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाने वाद मिटवला तरी पत्नी सुनीताच्या मनात अजूनही राग? काय म्हणाली सून कश्मीरा?

अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंह नुकतीच लग्नबंधनात अडकली. या लग्नसोहळ्या सर्वांना एकाच पाहुण्याच्या उपस्थितीची प्रतीक्षा होती, ती म्हणजे अभिनेता गोविंदा. भाचा कृष्णा अभिषेकसोबतच्या वादामुळे गोविंदा आरतीच्या लग्नापूर्वीच्या कोणत्याच कार्यक्रमांना उपस्थित नव्हता.

गोविंदाने वाद मिटवला तरी पत्नी सुनीताच्या मनात अजूनही राग? काय म्हणाली सून कश्मीरा?
कृष्णा अभिषेक-कश्मिरा शाह आणि गोविंदा-सुनीताImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 27, 2024 | 11:47 AM
Share

कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहच्या लग्नात अभिनेता गोविंदाच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. गोविंदाच्या उपस्थितीने कृष्णा आणि त्याच्यातील तब्बल आठ वर्षांपूर्वीचा वाद मिटल्याचं म्हटलं जात आहे. कृष्णाची पत्नी कश्मीरा शाह आणि गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांनी अप्रत्यक्षपणे एकमेकींना टोमणे मारल्याने या वादाची सुरुवात झाली होती. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमात कश्मीरा म्हणाली होती की गोविंदा आरतीच्या लग्नात आले तर मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेईन. म्हटल्याप्रमाणेच जेव्हा गोविंदाने लग्नाला हजेरी लावली तेव्हा सून कश्मीरा त्यांच्या पाया पडायला गेली. गोविंदा जरी वाद बाजूला ठेवून भाचीच्या लग्नाला उपस्थित राहिले असले तरी त्याची पत्नी सुनीता या लग्नात कुठेच नव्हती. त्यावर कश्मीराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कश्मीरा म्हणाली, “लग्नात पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मीच उभी होते आणि कृष्णा स्टेजवर आरतीसोबत होता. जेव्हा गोविंदा तिथे आले, तेव्हा त्यांना पाहून मला खूप आनंद झाला आणि मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर मी त्यांना स्टेजकडे घेऊन गेले. स्टेजवर जेव्हा मी त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकले, तेव्हा त्यांना मला थांबवलं आणि म्हणाले, “जीते रहो, खुश रहो.” मी त्यांच्या पाया पडायला वाकले म्हणजे एका अर्थाने मी त्यांची माफीच मागितली आहे.”

View this post on Instagram

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

कृष्णा आणि कश्मीरा यांना जुळी मुलं आहेत. त्यांचीही भेट तिने गोविंदाशी करून दिली. गोविंदाने मुलांना मिठी मारली आणि त्यांना आशीर्वाद दिला तेव्हा कश्मीरासुद्धा भावूक झाली होती. कौटुंबिक वाद विसरून आरती सिंहच्या लग्नाला गोविंदा उपस्थित राहिले असले तरी त्याची पत्नी सुनीता लग्नापासून दूरच राहिली. याविषयी कश्मीरा पुढे म्हणाली, “त्या लग्नाला येतील अशी मला अपेक्षा नव्हती. त्यांना रागावण्याचा हक्क आहे. मी नंतर त्यांच्याशी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करेन.”

गोविंदा-कृष्णा यांच्यात कशामुळे भांडण?

कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद हा कश्मीरा शाहच्या एका ट्विटमुळे सुरू झाला होता. 2016 मध्ये कृष्णा एक शो करत होता, ज्यामध्ये गोविंदाला आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्याने भाच्याच्या शोमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर कृष्णाची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीराने एक ट्विट केलं होतं. ‘काही लोक पैशांसाठी डान्स करतात’, असं तिने ट्विटद्वारे टोमणा मारला होता. गोविंदाची पत्नी सुनिताला असं वाटलं की कश्मीराने हे ट्विट त्यांच्या कुटुंबीयांसाठी केलंय. यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला.

अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल...
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.