AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या लग्नानंतरही ती कुटुंबात…; आमिर खानच्या पहिल्या पत्नीविषयी किरण रावचा खुलासा

आमिर खान आणि किरण राव यांनी 2005 मध्ये लग्नगाठ बांधली. आमिरचं हे दुसरं लग्नही टिकलं नाही. 2021 मध्ये किरण आणि आमिरने घटस्फोट घेतला. आमिरला पहिल्या पत्नीपासून आयरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे. तर किरण राव आणि आमिर यांना आझाद हा मुलगा आहे.

माझ्या लग्नानंतरही ती कुटुंबात...; आमिर खानच्या पहिल्या पत्नीविषयी किरण रावचा खुलासा
घटस्फोटानंतरही आमिरसोबत मैत्रीपूर्ण नातं का? किरण रावने दिलं उत्तर Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 13, 2024 | 1:19 PM
Share

मुंबई : 13 मार्च 2024 | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने जरी त्याच्या दोन्ही पूर्व पत्नींना घटस्फोट दिला असला तरी हे तिघंही एका कुटुंबाप्रमाणे एकमेकांसोबत वागतात. आमिरची पहिली पत्नी रिना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव यांचंही एकमेकांशी खूप चांगलं नातं आहे. या दोघी अनेकदा एकत्रही दिसतात. त्यामुळे अनेकांना आमिरच्या कुटुंबाविषयी प्रश्न पडतो. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण राव या सर्व गोष्टींबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. आमिर आणि किरणने 2005 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर 2021 मध्ये दोघं विभक्त झाले.

“..तेव्हासुद्धा रिना कुटुंबाचाच भाग होती”

आमिरसोबतच्या लग्नाविषयी किरण म्हणाली, “मी खूप नशीबवान आहे की माझं लग्न एका कुटुंबात झालं. एक असं कुटुंब ज्यावर मी प्रेम करायचे आणि करत राहीन. आमिरची आई झीनत हुसैन यांच्यावर माझं सर्वाधिक प्रेम आहे. आमिरचं कुटुंब खूप अनोख्या पद्धतीचं आहे. आमिर आणि रिना यांचा 2002 मध्ये घटस्फोट झाला, मात्र त्यानंतरही रिनाने कधीच कुटुंब सोडलं नव्हतं. रिनाच्या बाबतीत हे कुटुंब खूप प्रोटेक्टिव्ह आहे आणि जेव्हा माझं लग्न झालं, तेव्हासुद्धा रिना या कुटुंबाचाच एक भाग होती. आमच्यात कालांतराने खूप चांगली मैत्री झाली. रिना एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे.”

“लोकांना आमचं कुटुंब विचित्र वाटू शकतं पण..”

घटस्फोटानंतरही कुटुंब वेगळं झालं नसल्याचं किरणने स्पष्ट केलं. आमिर आणि किरणचा मुलगा आझाद, आमिर आणि रिनाची मुलं आयरा आणि जुनैद हे सर्वजण कुटुंब या धाग्याशी जोडले गेले आहेत. जानेवारी महिन्यात जेव्हा आयराचं लग्न झालं, तेव्हा सर्वजण मिळून या लग्नासाठी तयारी करत होते आणि आमिरचं सर्व कुटुंब या लग्नसोहळ्याला उपस्थित होतं. “लोकांना असं वाटत असेल की हे संपूर्ण कुटुंबच विचित्र आणि क्रेझी आहे. पण आम्ही असेच आहोत आणि हेच आमचं सत्य आहे”, असं किरण पुढे म्हणाली.

किरण आणि आमिरने 2005 मध्ये लग्न केलं. या दोघांना सरोगसीच्या माध्यमातून मुलगा झाला. लग्नाच्या 15 वर्षांनंतर किरण आणि आमिरने विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. जानेवारी महिन्यात पार पडलेल्या आयरा खानच्या लग्नात किरण आणि रिना या दोघींनी मिळून सर्व तयारी केली होती.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.