AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय दत्तच्या मेहुणीने माधुरी दीक्षितवर केलेले गंभीर आरोप, ‘तिला कोणताही पुरुष…’, तेव्हा नेमकं काय झालेलं?

Madhuri Dixit - Sanjay Dutt : माधुरी दीक्षित हिच्यावर संजय दत्त याच्या मेहुणीने का केलेले गंभीर आरोप? म्हणालेली, 'कोणताही पुरुष तिला...', तेव्हा नेमकं काय घडलेलं होतं? आज दोघे कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

संजय दत्तच्या मेहुणीने माधुरी दीक्षितवर केलेले गंभीर आरोप, 'तिला कोणताही पुरुष...', तेव्हा नेमकं काय झालेलं?
Madhuri Dixit
| Updated on: Mar 26, 2026 | 11:23 AM
Share

Madhuri Dixit – Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त सध्या ‘धुरंधर 2’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्याने अस्लम चौधरी ही भूमिका साकारली आहे. सिनेमातील संजूबाबाच्या भूमिकेला सर्वांनी डोक्यावर घेतलं आहे. आता सिनेमामुळे चर्चेत असलेल्या संजूबाबा याच्या खासगी आयुष्याची देखील चर्चेत आहे. आता संजय दत्त तिसरी बायको आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा देखील होता जेव्हा अभिनेत्याने 20 – 30 नाही तर, तब्बल 308 महिलांना डेट केलं होतं… याचा स्वीकार खुद्द अभिनेत्याने केलेला.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत देखील संजूबाबाच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या. पण तेव्हा अभिनेता विवाहित आणि एका मुलीचा बाप देखील होचा… संजय दत्त याच्या पहिल्या पत्नीचं नाव रिचा शर्मा असं होतं. दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. रिचा हिच्या निधनानंतर अभिनेत्याची मेहुनी एना शर्मा हिने माधुरीवर अनेक गंभीर आरोप केले. ‘Madhuri Dixit मुळे माझ्या बहिणीचा संसार मोडला’ असं रिचाच्या बहिणीने एका मुलाखतीत सांगितलं.

रिचा शर्मा हिची बहीण एना शर्मा हिने सांगितल्यानुसार, ‘संजय आणि माधुरी एकमेकांचे चांगले मित्र होते. पण आम्ही कधीच त्यांच्या मैत्रीवर बोट ठेवला नाही… पण माधुरीने माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला. माधुरी हिच्यामध्ये माणुसकी बिलकूल नाहीये… ती चांगली व्यक्ती नाही… मला असं म्हणायचं आहे की, तिला दुसरा कोणतही चांगला पुरुष भेटला असता… माधुरी अशा पुरुषासोबत कशी राहू शकते, ज्याने स्वतःच्या बायकोसोबत असं वर्तन केलं आहे.’, असं देखील संजय याची मेहुणी म्हणालेली.

पण एका मुलाखतीत संजय याने देखील यावर मोठं वक्तव्य केलं होतं. संजूबाबा म्हणालेला, ‘आमच्यामध्ये असं काही असायला तर हवं होतं, ज्यामुळे मी माधुरी हिच्यासोबत लग्न करु शकू… पहिल्या दिवसापासून ती माझी मैत्रीण होती..’ असं संजूबाबा म्हणालेला. पण अशी देखील चर्चा होती की, संजय याच्यासोबत असलेलं नातं माधुरी हिच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. पण जेव्हा मुंबई येथे झालेल्या बॉम्बस्फोटात संजय दत्त याचं नाव पुढे आलं, तेव्हा माधुरी दीक्षित हिने संजूबाबाची साथ सोडली. तेव्हा पासून कधीही दोघे एकत्र आले नाही. आता संजय दत्त आणि माधूरी दीक्षित त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत.

Follow Us
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला....
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला.....
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.