Sapna Chaudhary: आधी गुन्हा दाखल, आता अटक वॉरंट जारी; सपना चौधरी आणि वादांची मालिका

सपना चौधरी व्यतिरिक्त एफआयआरमध्ये कार्यक्रम आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, इवाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय यांचीही नावं आहेत. 13 ऑक्टोबर 2018 रोजी स्मृती उपवन याठिकाणी दुपारी 3 ते 10 या वेळेत नृत्याचा कार्यक्रम होणार होता.

Sapna Chaudhary: आधी गुन्हा दाखल, आता अटक वॉरंट जारी; सपना चौधरी आणि वादांची मालिका
Sapna Chaudhary: सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 5:04 PM

प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीविरोधात (Sapna Chaudhary) लखनौ इथल्या न्यायालयाने (Lucknow court) अटक वॉरंट (arrest warrant) जारी केलं आहे. एका नृत्याच्या कार्यक्रमाच्या तिकिटाचे पैसे घेऊन त्याठिकाणी हजर न राहिल्याने सपनाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी पुढील सुनावणीची तारीख 30 सप्टेंबर निश्चित केली आहे. याच न्यायालयाने नोव्हेंबर 2021 मध्ये सपनाविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर ती न्यायालयात हजर राहिली होती आणि तिला जामीनसुद्धा मिळाला होता. सपनाला सोमवारी कोर्टात हजर राहायचं होतं. पण ती गैरहजर राहिली आणि तिच्या वकिलानेही कोणत्याही प्रकारची सूट मागितली नाही. त्यामुळे न्यायालयाने सपनाविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे.

या संदर्भात उपनिरीक्षक फिरोज खान यांनी 14 ऑक्टोबर 2018 रोजी लखनौमधील आशियाना पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. सपना चौधरी व्यतिरिक्त एफआयआरमध्ये कार्यक्रम आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, इवाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय यांचीही नावं आहेत. 13 ऑक्टोबर 2018 रोजी स्मृती उपवन याठिकाणी दुपारी 3 ते 10 या वेळेत नृत्याचा कार्यक्रम होणार होता आणि या कार्यक्रमाची तिकिटं 300 रुपये दराने ऑनलाइन आणि ऑफलाइन विकली गेली होती. ऐनवेळी सपना चौधरी कार्यक्रमाला न आल्याने आणि त्यांचे पैसेही परत न दिल्याने कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी गोंधळ घातला होता.

हे सुद्धा वाचा

सपनावर फसवणूक आणि विश्वासघाताचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सपना चौधरीविरुद्ध फसवणूक आणि विश्वासभंगाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला होता. एका सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीने तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.