AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याने माझी फसवणूक केली, मुलीखातर मला..; संजय कपूरच्या पत्नीचा खुलासा

लग्नाच्या सुरुवातीच्या काळात संजय कपूरने फसवणूक केल्याचं महीपने सांगितलं. त्या घटनेनंतर मुलगी शनायाला घेऊन त्या घराबाहेर पडल्या होत्या. महीप आणि संजय यांच्या लग्नाला आता 27 वर्षांचा काळ झाला आहे. या दोघांना शनाया ही मुलगी आणि जहान हा मुलगा आहे.

त्याने माझी फसवणूक केली, मुलीखातर मला..; संजय कपूरच्या पत्नीचा खुलासा
Maheep Kapoor and Sanjay KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2024 | 3:54 PM
Share

अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने 2022 मध्ये ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला होता. संजयने नात्यात फसवणूक केल्याचं तिने सांगितलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महीप आयुष्यातील त्या कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पतीच्या फसवणुकीनंतरही वैवाहिक नात्यात कायम राहण्याचा निर्णय का घेतला, यामागचं कारण तिने सांगितलं. ‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महीप म्हणाली, “मला असं वाटतं की लोकांना त्यांच्या चौकटीतून बाहेर येऊन समोरच्या व्यक्तीकडे बघायची इच्छाच नसते. त्या व्यक्तीच्या जागी राहून गोष्टी समजून घेण्यास ते तयार नसतात. प्रत्येकाला ब्रेक द्या, प्रत्येकजण परफेक्ट नसतो, प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी चूक करतोच”, असं ती म्हणाली.

या मुलाखतीत महीपची मैत्रीण आणि चंकी पांडेची पत्नी भावना पांडे म्हणाली, “ती तिच्या निर्णयाशी कम्फर्टेबल आहे. तो तिचा पर्याय आहे.” मुलांसाठी घरातील वातावरण सकारात्मक ठेवणं किती महत्त्वाचं असतं, यावरही महीपने जोर दिला. “तुम्ही याबद्दल तुमचं मत मांडू शकता, पण त्याबद्दल अगदीच नकारात्मक होऊ नका. माझीही काही मतं आहेत, पण त्याबद्दल मी पूर्णपणे नकारात्मक नाही. कोणतीही मदत लागली तर आपले आईवडील आपल्यासोबत आहेत, याची जाणीव कायम मुलांना असायला हवी. त्यांच्याकडे तो कम्फर्ट झोन असणं आवश्यक असतं आणि हे त्यांच्यासाठी सुरक्षित क्षेत्र आहे, हे त्यांना माहित असणं आवश्यक असतं”, असं ती पुढे म्हणाली.

संजय किंवा तुझ्यापैकी सर्वांत कठोर पालक कोण आहे, असा प्रश्न विचारला असता महीपने क्षणाचाही विलंब न करता संजयचं नाव घेतलं. “संजय मुलांप्रती कठोर आहे. यामागचं कारण मला असं वाटतं की, त्याने अनेक महिलांना डेट केलंय. त्याने हे जे काही केलंय, त्यामुळे तो त्याच्या मुलीबद्दल अधिक घाबरून आहे. हे सत्य आहे. तो शनायाबाबत वेडा होईल. माझ्या मुलाबाबत त्याला इतकी भीती नाही. पण शनायाबाबत मला त्याला सांगावं लागतं की जरा शांत हो. मग मला समजलं की तो असा विचार करत असेल की एखाद्या मुलाने तिच्यासोबत तेचं केलं तर काय होईल? तो वडील म्हणून खूप कठोर आहे पण हळूहळू तो जरा शांत होतोय”, असं तिने सांगितलं.

2022 मध्ये नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये संजय कपूरच्या फसवणुकीबाबत महीप म्हणाली होती, “माझ्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात संजयने नात्यात माझी फसवणूक केली. तेव्हा मी शनायाला घेऊन बाहेर पडले. मी स्वत:साठी तो निर्णय घेतला होता. पण माझ्या हातात नुकतीच जन्मलेली मुलगी होती. एक महिला म्हणून आणि एक आई म्हणून मी मुलीला प्राधान्य दिलं. माझ्या मुलीला वडिलांचं प्रेम मिळावं ही भावना मनात होती. जर मी त्यावेळी हे नातं मोडलं असतं तर मी आयुष्यभर पश्चात्ताप केला असता. कारण आता जेव्हा माझी मुलं माझ्या घरी येतात, माझा पती जेव्हा घरात येतो, तेव्हा त्यांच्यासाठी ती जागा सर्वांत सुंदर असते. ती शांतता अनुभवणं त्यांची गरज आहे आणि तीच शांतता संजय मलाही देतो.”

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.