AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सनई चौघडे’मध्ये मोठा ट्विस्ट; जयला होणार चुकीचा पश्चात्ताप, शरुला आणणार परत

'सनई चौघडे' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. जयने तुरुंगातून येताच शरुसह ऑफिसमधील सर्व महिलांना काढून टाकलं आहे. मात्र त्याला त्याच्या चुकीचा पश्चात्ताप होणार आहे.

'सनई चौघडे'मध्ये मोठा ट्विस्ट; जयला होणार चुकीचा पश्चात्ताप, शरुला आणणार परत
राज हंचनाळे, चिन्मयी साळवीImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 07, 2026 | 1:49 PM
Share

झी मराठी वाहिनीवरील ‘सनई चौघडे’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत आता कथेला नवं वळण मिळणार आहे. गैरसमज, नात्यांतील तणाव आणि त्यातून होणारी जाणीव यामुळे मालिकेत मोठे बदल घडताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. जेलमधून सुटल्यानंतर शरू जयसाठी स्वागताची तयारी करतेय. मात्र, आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांसाठी जय महिलांनाच जबाबदार धरतो. रागाच्या भरात तो आपल्या कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतो. जयच्या या निर्णयामुळे शरू खूप दुखावली आहे.

गौतम जयसमोर सर्व सत्य आणतो. जयला वाचवण्यासाठी शरूने स्वतःच्या सन्मानाचीही पर्वा केली नाही. शरूच्या संघर्षाची जाणीव होताच जयला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होणार आहे. तो सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू करून घेणार आहे. दुसरीकडे, परब कुटुंबात आसावरीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. गौतम जबाबदार आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा अशी सुभाषची इच्छा आहे. त्यासाठी तो गौतमची परीक्षा घेण्याचं ठरवतो. दरम्यान, प्रॉडक्ट सर्व्हेदरम्यान शरू जयला सामान्य लोकांशी कसं जोडलं जावं हे शिकवते. त्याचा दृष्टिकोन बदलण्यास ती मदत करते. याच वेळी एक वयोवृद्ध जोडपं त्यांना नवरा-बायको समजतात. त्या जोडप्याच्या बोलण्यामुळे जयला शरूमुळे आपल्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल जाणवतो.

पहा प्रोमो-

आता शरू आणि जयच्या नात्याला नवी दिशा मिळणार का? जयचा हा बदल कायम राहणार का? गौतम स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील. ‘सनई चौघडे’ ही मालिका दररोज रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सनई चौघडे’ ही मालिका पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. लालबाग परळ मधील हे मध्यमवर्गीय कुटुंब लोकांना भावतं आहे. म्हणून मालिका सुरू होताच पहिल्याच आठवड्यात टॉप 10 मालिकांच्या यादीत ‘सनई चौघडे’नं स्थान मिळवलं होतं. कथानकातील वेगळेपणा आणि भावनिक गुंतवणूक आणि स्वामींचा आशीर्वाद यामुळे प्रेक्षकांकडून मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जय आणि शरू यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा