AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सरनंतर अभिनेत्रीला आता ऑटोइम्युन आजार; सेल्फी शेअर करत म्हणाली ‘मी माझा रंग गमावतेय..’

ममताने रविवारी इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही सेल्फी पोस्ट केले आणि चाहत्यांना सांगितलं की ती एका मोठ्या ऑटोइम्युन आजाराचा सामना करतेय. विटिलिगो (Vitiligo) या आजाराशी झुंज देत असल्याचं तिने सांगितलं.

कॅन्सरनंतर अभिनेत्रीला आता ऑटोइम्युन आजार; सेल्फी शेअर करत म्हणाली 'मी माझा रंग गमावतेय..'
Actress Mamta MohandasImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2023 | 8:11 AM
Share

केरळ: दाक्षिणात्य अभिनेत्री ममता मोहनदासने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोद्वारे धक्कादायक खुलासा केला आहे. ममताने रविवारी इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही सेल्फी पोस्ट केले आणि चाहत्यांना सांगितलं की ती एका मोठ्या ऑटोइम्युन आजाराचा सामना करतेय. विटिलिगो (Vitiligo) या आजाराशी झुंज देत असल्याचं तिने सांगितलं. इतकंच नव्हे तर या आजारामुळे ती तिचा रंग गमावतेय, असंही तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

काळ्या रंगाचा टी-शर्ट, टाइट्स, जॅकेट आणि हातात कप अशा लूकमध्ये ममता या फोटोमध्ये पहायला मिळतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे, ‘प्रिय सूर्य, मी तुझ्या किरणांना आता अशा पद्धतीने अनुभवतेय, जसं याआधी मी कधीच अनुभवलं नव्हतं. माझ्या शरीरावर बरेच डाग आहेत, मी माझा रंग गमावतेय. आता मी पहाटे तुझ्याही आधी जागी होते. धुक्यातून तुझ्या प्रकाशाचा पहिला किरण बाहेर पडताना पाहण्यासाठी.. मला ते सर्व दे जे तुझ्याकडे आहे. मी कृतज्ञ आहे.’

या पोस्टमधअये ममताने कलर, ऑटोइम्युन आजार, विटिलिगो आणि सनलाइट असे हॅशटॅग वापरले आहेत. ममताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्री रेबा मोनिका जॉनने लिहिलं, ‘तू लढवय्यी आहेस आणि तू सुंदर आहेस.’ चाहत्यांनीही ममतासाठी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mamta Mohandas (@mamtamohan)

ममताने याआधी कॅन्सरवर यशस्वी मात केली. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिने अमेरिकेत त्यावर उपचार घेतले. 2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितलं होतं. “आजारपणाआधी मी जितकी कणखर होती, तितकीच मी आताही आहे असं मी बोलू शकत नाही. मी अशी व्यक्ती होती, जी कोणाबद्दलच चिंता करायची नाही. मात्र माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच घाबरतेय. सकारात्मक रहा, हे बोलणं खूप सोपं असतं,” असं ती म्हणाली होती.

विटिलिगो काय आहे?

विटिलिगो हा एक ऑटोइम्युन आजार आहे. यामध्ये रुग्णाच्या त्वचेचा रंग उडू लागतो. त्याच्या शरीरावर पांढरे डाग दिसू लागतात. वेळेनुसार हे डाग वाढू लागतात.

ममता मोहनदासने 2005 मध्ये मल्याळम चित्रपटातून अभिनयविश्वात पदार्पण केलं. ‘बस कंडक्टर’ या चित्रपटात तिने मम्मूटी यांच्यासोबत भूमिका साकारली. ममता ही प्रसिद्ध पार्श्वगायिकासुद्धा आहे. मल्याळमसोबतच तिने काही तेलुगू, कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.