AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या दृश्याला आक्षेप… ‘छावा’ चित्रपटाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध, संभाजी राजेंचीही नाराजी

Chhaava Film: विकी कौशल स्टारर 'छावा' सिनेमातील एका दृश्याला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध, संभाजी राजे यांच्याकडून देखील नाराजी व्यक्त, सध्या सर्वत्र 'छावा' सिनेमाची चर्चा रंगली आहे.

त्या दृश्याला आक्षेप... 'छावा' चित्रपटाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध, संभाजी राजेंचीही नाराजी
chhawa
| Updated on: Jan 24, 2025 | 12:06 PM
Share

Chhaava Film: अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. चित्रपटात विकी कौशल लेझिमवर नृत्य करताना दिसला आहे. ज्यावर संभाजी राजे यांच्यासह तृप्ती देसाई यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. तर ‘छावा’ सिनेमातील त्या दृश्याला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध होत आहे.

विकी कौशल याच्या लेझिम नृत्यावर नाराजी व्यक्त करत संभाजी राजे म्हणाले, ‘छावा चित्रपटात संभाजीराजे हे लेझिमवर नृत्य करताना दिसले आहेत. लेझिम खेळताना दाखविणं चुकीचं नाही, पण ते लेझिमवर नृत्य करताना दाखविले आहेत. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा आहेत. संभाजी राजे यांच्या जीवनावर छावा चित्रपट होतोय ही आनंदाची बाब आहे.

पुढे संभाजी राजे म्हणाले, ‘चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी भेट घेतली होती, त्यावेळेला सर्व चित्रपट झाल्यानंतर तो चित्रपट इतिहास अभ्यासकांसोबत दाखवा अशी विनंती केली होती. आता देखील त्यांना विनंती आहे, त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना तो चित्रपट दाखवावा.

छत्रपती संभाजी महाराज याच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक उत्तेकर एक मराठी माणूस आहे त्यांनी खूप मोठं धाडस करून संभाजी महाराजांवर चित्रपट बनवला आहे. त्यामुळे यामध्ये कुठलेही चुका राहू नयेत अशीच आमची ही इच्छा आहे. असं देखील संभाजी राजे म्हणाले.

सांगायचं झालं तर, सध्या सर्वत्र ‘छावा’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर अभिनेता विकी कौशलच्या अभिनयकौशल्याचंही खूप कौतुक होतंय. ‘छावा’ हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सर्वत्र ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा