AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटीलच्या आवडत्या गाण्यावर ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा डान्स, स्टेप पाहून सर्वजण थक्क, होतंय प्रचंड कौतुक

गौतमी पाटीलच्या सर्वात आवडत्या गाण्यावर मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचा डान्स. स्टेप पाहून कलाकारांनी देखील केलं कौतुक. होतोय कमेंट्सचा वर्षाव.

गौतमी पाटीलच्या आवडत्या गाण्यावर ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा डान्स, स्टेप पाहून सर्वजण थक्क, होतंय प्रचंड कौतुक
| Updated on: Sep 02, 2026 | 2:45 PM
Share

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आणि आदर्श जोडी म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्याकडे पाहिलं जातं. अभिनयासोबतच ही जोडी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. ट्रेंडिंग गाण्यांवर दोघांचे भन्नाट डान्स व्हिडीओ अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. अशातच आता पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांनी आपल्या जबरदस्त डान्सने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे. त्यांच्या डान्सची एनर्जी पाहता, गौतमी पाटीललाही टक्कर देईल असा डान्स असल्याचे अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध मराठी लोकगीत ‘बघ बघ अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय…’ हे गाणं सध्या प्रचंड ट्रेंडिंग होताना दिसत आहे. अशातच चाहत्यांनी त्यांच्याकडे या गाण्यावर दोघांनी डान्स करण्याची मागणी केली. चाहत्यांच्या याच मागणीला पूर्ण करण्यासाठी दोघांनी या गाण्यावर डान्स केला आहे. दोघांनी या गाण्यावर केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ ऐश्वर्या नारकरांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याला ‘On Public Demand’ असं खास कॅप्शन दिलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकर सुंदर मजंठा रंगाच्या साडीत तर अविनाश नारकर ग्रे रंगाच्या कुर्त्यात दिसत आहेत. दोघांनीही गाण्याच्या तालावर जबरदस्त डान्स करत आपली एनर्जी दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे, स्वतः ऐश्वर्या यांनीच त्यांच्या डान्स स्टेप्स परफेक्ट नसल्याचं मजेशीरपणे म्हटलं आहे. ‘आमच्या डान्स स्टेप्स परफेक्ट नाहीयेत पण, आमची जोडी एकदम परफेक्ट आहे’ असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

कलाकारांनी केलं डान्सचं कौतुक

नारकर दाम्पत्याचा हा डान्स पाहून चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. “खूप भारी मस्त डान्स”, “तुम्हा दोघांचा डान्स पाहून कायम भारी वाटतं”, “लय भारी डान्स”, “सरांची एनर्जी कमालच आहे”, “सर्वात आवडती जोडी” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. अभिनेत्री अश्विनी कासार, नंदिता पाटकर आणि तितीक्षा तावडे यांनीही या व्हिडीओवर कमेंट करत नारकर दाम्पत्याचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर सध्या स्टार प्रवाहवरील ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर अविनाश नारकर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘तारिणी’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा