AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mayuri Deshmukh | दुसरं लग्न करणार का? अभिनेत्री मयुरी देशमुख म्हणते, “माझा विचार आहे…”

अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती अभिनेता आशुतोष भाकरेने दहा महिन्यांपूर्वी नांदेडमध्ये आत्महत्या केली होती (Mayuri Deshmukh Second Marriage )

Mayuri Deshmukh | दुसरं लग्न करणार का? अभिनेत्री मयुरी देशमुख म्हणते, माझा विचार आहे...
अभिनेत्री मयुरी देशमुख
| Updated on: Apr 30, 2021 | 1:24 PM
Share

मुंबई : ‘खुलता कळी खुलेना’ (Khulta Kali Khulena) मालिकेतून छोटा पडदा गाजवलेली अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) पती-अभिनेता आशुतोष भाकरेच्या (Ashutosh Bhakre) निधनानंतर त्याच्या आठवणींना उजाळा देत असते. आशुतोषच्या निधनाला जेमतेम नऊ महिने होत असताना मयुरीला दुसऱ्या लग्नाबद्दल छेडलं जातं. मयुरीने उत्तर देताना मूल दत्तक घेण्याचा विचार बोलून दाखवला. मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे? असा सवाल करत तिने आशुतोषवरील शाश्वत प्रेम अधोरेखित केलं. (Marathi Actress Mayuri Deshmukh answers about Second Marriage after Husband Ashutosh Bhakre Suicide)

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री मयुरी देशमुखने आपल्या भावी वाटचालीबद्दल सांगितलं. “माझ्यासाठी, माझ्या कुटुंबातील प्रत्येकासाठी 2020 हे वर्ष अत्यंत कठीण गेलं. माझा पती आशुतोष आमच्यापासून कायमचा दूरावला. त्याच्या जाण्याचं दुःख अक्षरशः आभाळ कोसळण्यासारखंच होतं. परंतु त्यातून बाहेर पडणंही तितकंच गरजेचं होतं. माझ्या कुटुंबातल्या सर्वांनी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनी मला या दुःखातून बाहेर पडायला खूप मदत केली. त्यामुळेच मी पुढच्या प्रवासाला सुरुवात करु शकले.” असं मयुरी म्हणाली.

मूल दत्तक घेण्याचा विचार

“माझं आजही आशुतोषवर मनापासून प्रेम आहे. आजही तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासह मी एकटी आयुष्य घालवू शकते. आशुतोषला त्याच्या भाचीचा खूप लळा होता. त्याला लहान मुलं खूप आवडायची. त्यामुळेच मी मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहे. अनेक जण मला दुसऱ्या लग्नाबद्दल आडून-आडून सुचवू पाहतात. मात्र मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे?” असा प्रश्नच तिने विचारला.

मयुरी देशमुख सध्या स्टार प्लस (Star Plus) वाहिनीवर ‘इमली’ (Imli) या मालिकेत अभिनेता गश्मीर महाजनीसह (Gashmir Mahajani) मुख्य भूमिकेत दिसते आहे. तिने खुलता कळी खुलेना या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तर डिअर आजो या नाटकाचे लेखन करण्यासोबतच तिने अभिनयही केला होता. (Mayuri Deshmukh Second Marriage )

दुःख सावरत मयुरीचे पुरागमन

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने जवळपास दहा महिन्यांपूर्वी नांदेडमध्ये आत्महत्या केली होती. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या 32 व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. नैराश्यामुळे आशुतोषने आत्महत्या केली, असे म्हटले गेले होते. या घटनेने मयुरी देशमुखसह तिच्याच्या चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला होता.

कुटुंबीय घरात असतानाच गळफास

नांदेडमधील गणेश नगर इथल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराच वेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिले. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच थरकाप उडाला.

संबंधित बातम्या :

Mayuri Deshmukh | “आशुडा, अनेक प्रश्न अनुत्तरीत सोडलेस…” मयुरी देशमुखकडून भावनांना वाट मोकळी

मयुरी देशमुखचं पुनरागमन, गश्मीर महाजनीसोबत नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज

(Marathi Actress Mayuri Deshmukh answers about Second Marriage after Husband Ashutosh Bhakre Suicide)

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.