Daagdi Chaawl 2: ‘दगडी चाळ 2’मध्ये शकील-डॅडीमध्ये रंगणार नवं राजकारण; चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू

2015 मध्ये ‘दगळी चाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये पूजा सावंत, अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, संजय खापरे, यतिन कार्येकर, कमलेश सावंत यांच्या भूमिका होत्या. पहिल्या भागातील बरेच कलाकार हे दुसऱ्या भागातही पाहायला मिळणार आहेत.

Daagdi Chaawl 2: 'दगडी चाळ 2'मध्ये शकील-डॅडीमध्ये रंगणार नवं राजकारण; चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू
Daagdi Chaawl 2: 'दगडी चाळ 2'मध्ये शकील-डॅडीमध्ये रंगणार नवं राजकारण
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Aug 18, 2022 | 11:42 AM

मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chaawl 2) या चित्रपटात ‘सूर्या’ , ‘डॅडी’, ‘सोनल’ यांच्या कहाणीतला नवीन इक्का म्हणजे ‘शकील’. ‘सूर्या’ आणि ‘डॅडी’ या दोघांच्या वादात आता ‘शकील’ कहाणीला काय नवीन वळण आणतोय ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल. म्हणतात ना वैऱ्याचा वैरी म्हणजे मित्र हीच डोकॅलिटी वापरून ‘शकील’ने मारलेली कमाल एण्ट्री प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढवत आहे. ‘डॅडी’ची ऑफर सूर्या स्वीकारतो की शकीलसोबत हात मिळवतो हे गुपित अजून गुलदस्त्यातच आहे. शकीलने दिलेली ऑफर सूर्या स्वीकारेल का? याचं उत्तर येत्या 19 ऑगस्टला चित्रपट पाहिल्यावरच कळणार. ‘डॅडी’ (Daddy) वर्सेस ‘शकील’ (Ashok Samarth) यांचं वैर चित्रपटाला वेगळाच तडका लावणार असा अंदाज व्यक्त होत आहे.

दगडी चाळ 2 या चित्रपटात अंकुश चौधरी (सूर्या), पूजा सावंत (सोनल), मकरंद देशपांडे (डॅडींच्या ) भूमिकेत असून शकीलच्या भूमिकेत अशोक समर्थ आहेत. दहशद, गँगवॉर, राजकारण, ॲक्शन आणि लव्हस्टोरी पुन्हा एकदा ‘दगडी चाळ 2’ मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याबाबत निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, “यंदा दगडी चाळ 2 चित्रपटात गँगवॅारसोबत राजकारणातील ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत आणि ते ट्विस्ट प्रेक्षकांना आवडतील ही आशा आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड प्रदर्शित होणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Daagdi Chaawl 2 (@dc2thefilm)

2015 मध्ये ‘दगळी चाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये पूजा सावंत, अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, संजय खापरे, यतिन कार्येकर, कमलेश सावंत यांच्या भूमिका होत्या. पहिल्या भागातील बरेच कलाकार हे दुसऱ्या भागातही पाहायला मिळणार आहेत. ‘दगडी चाळ’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर ‘चुकीला माफी नाही’ असं म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं’ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. आता या चित्रपटाच्या सीक्वेलला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें